मनोरंजनसृष्टीतील अनेक स्टार्स त्यांना मिळालेले पुरस्कार (Award) आणि चित्रपटांशी संबंधित अनेक आठवणी जपून ठेवतात. पण साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाने (Vijay Devarakonda ) त्याला मिळालेल्या पहिल्या फिल्म फेअर अवॉर्डचा लिलाव केला. त्याने त्याचा हा अवॉर्ड २५ लाख रुपयांना विकला. त्याने हे असं का केलं?, यामागे नेमकं काय कारण होतं? याचा खुलासा विजय देवरकोंडाने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.
विजय देवरकोंडाने अगदी कमी वेळामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कामावले आहे. विजयने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. विजय देवरकोंडा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. विजय देवरकोंडा त्यावेळी सर्वात जास्त चर्चेत आला जेव्हा त्याने पहिला फिल्म फेअर अवॉर्डचा लिलाव केला. त्याने २५ लाखांना हा अवॉर्ड विकून मिळालेले पैसे दान केले होते. या कृतीमुळे विजय देवरकोंडाला ट्रोल देखील करण्यात आले होते.
विजय देवरकोंडाने 2016 मध्ये 'पेल्ली चोपुलु' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा त्याचा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला पहिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला. नुकताच गलाट्टा प्लसला दिलेल्या मुलाखतीत विजयने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर अवॉर्डबद्दल सांगितले.
विजय देवरकोंडाने सांगितले की, 'अवॉर्डचा लिलाव केल्यानंतर मिळालेले पैसे मी दान केले आणि ही माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात चांगली आठवण आहे. हा अवॉर्ड विकून मिळालेली २५ लाखांची रक्कम मी मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीला दान केली होती. या माझ्यासाठी सोनेरी आठवणी आहेत.' या मुलाखतीत विजय देवरकोंडाने त्यांचे पुरस्कार कुठे आहेत हे देखील सांगितले.
खरं तर, विजयला विचारलं होतं की तुमच्या घरात अवॉर्डसाठी खास शेल्फ आहे का? यावर अभिनेता म्हणाला, 'काही पुरस्कार माझ्या ऑफिसमध्ये आहेत. काही माझ्या आईने घरी ठेवले असतील. कोणता माझा आहे, कोणता आनंदचा म्हणजे भावाचा आहे हे मला माहीत नाही. मी काही पुरस्कार देतो. त्यापैकी एक मी संदीप रेड्डी वंगा यांना दिला आहे. फिल्मफेअरमधील माझ्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचा आम्ही लिलाव केला. यातून खूप चांगले पैसे मिळाले. ही माझ्यासाठी माझ्या घरातील दगडाच्या तुकड्यापेक्षा चांगली आठवण आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.