जगभरात भरघोस कमाई करणारा 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' GOAT चित्रपटाच्या कमाईत घसरण होतांना दिसतेय. 'GOAT'चित्रपट 5 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा तसाच प्रतिसादही मिळाला. मात्र बॉक्स ऑफिसवर कमाईचा शिखर गाठणारा GOAT चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली आहे. साऊथ सुपरस्टार विजय थलापथी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.
साऊथ सुपरस्टार विजय थलापथीचा ॲक्शन चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच 135 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठव्या दिवशी या चित्रपटाने 6.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी भारतभरात 177.75 कोटी रुपये कमवणारा चित्रपट ठरला आहे. मात्र आता या चित्रपटाच्या कमीईमध्ये घसरण होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्री बुकिंग केली होती. साधारण 50 कोटींची प्री बुकिंग झाल्याचं सागितलं जात आहे. सुपरस्टार विजय थलापतीचा GOAT या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 177.75 कोटींचा गल्ला जमवला आहे तर जगभरात 335.50 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.
GOAT चित्रपटाच्या कमाईतील घसरण
पहिल्या दिवशी 44 कोटी
दुसऱ्या दिवशी 25.5 कोटी
तिसऱ्या दिवशी 33.5 कोटी
चौथ्या दिवशी 34 कोटी
पाचव्या दिवशी 14.1 कोटी
सहाव्या दिवशी 11 कोटी
सातव्या दिवशी 8.5 कोटी
आठव्या दिवशी 6.50 कोटी
थलपथी विजयने 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) मध्ये दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विजयसोबत प्रभु देवा, अजमल अमीर, मोहन, मीनाक्षी चौधरी, स्नेहा, लैला, वैभव रेड्डी आणि जयराम हे कलाकार आहेत. GOAT या सायन्स फिक्शन ॲक्शन ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'GOAT' चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 400 कोटींचा खर्च करण्यात आला होता. चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी विजयने 200 कोटी रुपये फी घेतली आहे. जगभरात या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.