Pushpa 2 Stampede Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Stampede: ती मला आयुष्य देऊन निघून गेली, 'पुष्पा 2'च्या प्रिमिअरदरम्यान पत्नीचा मृत्यू; मुलगा रुग्णालयात देतोय मृत्यूशी झुंज

Pushpa 2 Movie: 'पुष्पा 2'च्या प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यू झाला. तर या महिलेच्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत आहेत. सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर ति या महिलेचा ९ वर्षांचा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

हैदराबादमध्ये राहणारा श्रतेज रुग्णालयामध्ये जीवन-मरणाशी झुंज देत असून त्याची आई रेवतीचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. श्रीतेजचे वडील भास्कर यांना पत्नीच्या निधनाने मोठा धक्का बसलाय. बुधवारी रात्री 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियरदरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत रेवती यांचा मृत्यू झाला. रेवती यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या यकृत म्हणजेच लिव्हर पतीला दान केले होते अशी माहिती समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या रेवती यांचा नवरा भास्कर यांनी सांगितले की, २०२३ मध्ये त्यांची तब्येत अचानक खराब झाली. त्यांचे यकृत निकामी झाले होते. तेव्हा त्यांची रेवती यांनी आपले यकृत पतीला दान करून त्यांचे प्राण वाचवले होते. ती माझ्यासाठी जगत होती पण आता तिच राहिली नाही, अशा शब्दात भास्कर यांनी दु:ख व्यक्त केले.

रिपोर्टनुसार, रेवती यांचे संपूर्ण कुटुंब अल्लू अर्जुनचे फॅन आहेत. बुधवारी ९ वर्षांचा श्रतेज आणि त्याची बहीण सानवी यांनी चित्रपट पाहण्याचा हट्ट धरला होता. कुटुंबाने संध्या थिएटरमध्ये प्रीमियर पाहायला जाण्याचा प्लॅन केला. जिथे अल्लू अर्जुन स्वतः उपस्थित होता. दरम्यान, थिएटरमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये रेवती आणि श्रीतेज गर्दीत अडकले.

दरम्यान, सानवी रडायला लागल्यावर रेवतीचे पती भास्कर तिला सोडण्यासाठी आजी-आजोबांच्या घरी गेले होते. त्यांनी सांगितले की, जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगा तिथे भेटले नाहीत. काही तासांपूर्वी त्यांचे पत्नी रेवतीसोबत बोलणे झाले तेव्हा त्यांनी थिएटरमध्ये असल्याचे सांगितले होते. रेवतीने आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावला असल्याचे सांगितले जात आहे.

रेवती यांचे पती भास्कर यांनी सांगितले की, कोणीतरी मला एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने श्रीतेजला आपल्या मांडीवर घेतले होते. त्यानंतर त्याला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले. तो बेशुद्ध पडला होता. श्रीतेजला हायपोक्सिया आणि फुफ्फुसांना गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजता रेवतीच्या मृत्यूची बातमी मिळाल्याचे भास्कर यांनी सांगितले. आता भास्कर आपली मुलगी सानवीसाठी स्वत:ला स्ट्राँग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या धक्क्यातून सानवी अजूनही सावरली नाही. तर ज्या पत्नीने भास्कर यांचे प्राण वाचवले ती रेवती या जगात राहिली नाही यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला सोनं खरेदी का करतात? आयुष्यात होतो 'हा' मोठा बदल

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

SCROLL FOR NEXT