Pushpa 2: ‘पुष्पा 2’ चित्रपट पाहण्यासाठी गेला माघारी आलाच नाही, रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू

Pushpa 2 News Update : पुष्पा चित्रपटाचा पहिल्या भागाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतूरतेने वाट पाहत होते.
Pushpa 2 The Rule Movie
Pushpa 2 New poster Saam Tv
Published On

बेंगळुरू : (Pushpa 2) देशभरात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा पहिल्या भागाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतूरतेने वाट पाहत होते. आता चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत, आणि जे लोक चित्रपट पाहून परतत आहेत ते त्याचे कौतुक करत आहेत. मात्र, याच दरम्यान बेंगळुरूच्या बाशेट्टीहळ्ळी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. 19 वर्षीय तरुणाचा रेल्वे ट्रॅक ओलांडताना ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला आहे.

कसा घडला हा अपघात?

ही घटना गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. परवीन तामाचलम असे मृत तरुणाचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील रहिवासी होता. परवीन बाशेट्टीहळ्ळी औद्योगिक क्षेत्रात एका खाजगी कंपनीत काम करत होता.

Pushpa 2 The Rule Movie
Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीन आणि त्याचे दोन मित्र गांधीनगरमधील वैभव थिएटरमध्ये सकाळी 10 वाजता होणाऱ्या ‘पुष्पा 2’ च्या शोसाठी जात होते. बाशेट्टीहळ्ळी येथे रेल्वे ट्रॅक पार करताना, परवीनने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनकडे दुर्लक्ष केले आणि ट्रॅकवर चढला. ट्रेनची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Pushpa 2 The Rule Movie
Pushpa 2 : पायरसीचा झटका अन् निर्मात्यांना फटका, तासाभरातच 'पुष्पा 2' लीक

मित्रांनी घाबरून घटनास्थळ सोडले

या घटनेनंतर परवीनचे दोन्ही मित्र घाबरून घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जर हा अपघात होता तर घाबरून पळून जाण्याचा काय संबंध आहे, यादृष्टीनेही तपास केला जातोय. 

मिळालेल्या माहितीनुसार परवीनने आयटीआय डिप्लोमा केलेला होता आणि त्याच्याशी संबंधीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. तो अल्लू अर्जूनचा चाहता होता. तो चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होता, परंतु रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या घाईत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना पुन्हा एकदा दाखवते की घाई आणि बेफिकीरपणा कधी कधी प्राणघातक ठरू शकतो. परवीनसारखे तरुण आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असतात, परंतु एका छोट्या चुकीमुळे त्यांचे जीवन कायमचे संपते. चित्रपट पाहण्याचा उत्साह त्याच्या जीवावर बेतला.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com