Pushpa 2 : पायरसीचा झटका अन् निर्मात्यांना फटका, तासाभरातच 'पुष्पा 2' लीक

Pushpa 2 Leak : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट रिलीजनंतर तासाभरातच लीक झाला आहे. यामुळे निर्मात्यांना कोट्यावधींचा फटका मिळणार आहे.
Pushpa 2 Leak
Pushpa 2SAAM TV
Published On

बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 ) आज (5 डिसेंबर)ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'पुष्पा 2 ' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र हैदराबादमध्ये हा चित्रपट आधी प्रदर्शित करण्यात आला.

'पुष्पा 2' चित्रपटाचा प्रीमियर हैदराबादला पार पडला. येथे चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहते तेथे आले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. यात अनेक जण जखमी झाले तर एका महिला फॅनचाही मृत्यू देखील झाला आहे.

'पुष्पा 2' चित्रपट काही तासातच लीक झाला आहे. याला पायरसीचा झटका बसला आहे. 'पुष्पा 2' चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपट पायरसी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. फ्री डाउनलोड करून तुम्हाला चित्रपट पाहता येतो. उदा. मूवीरुलज, फिल्मीजला, 9xमूवीज. तसेच 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट HD देखील पाहायला मिळत आहे. तसा ऑप्शन तेथे उपलब्ध आहे. गुगलवर पुष्पा 2 चित्रपटाच्या डाउनलोड संबंधित अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत.

'पुष्पा 2' चित्रपट पाहण्यासाठी चाहते रांगा लावत आहेत. अशात जर चित्रपट ऑनलाइन दिसू लागला तर चाहते घरबसल्या चित्रपटाचा आनंद घेतील. मात्र 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांना कोट्यावधींचा फटका बसेल. 'पुष्पा 2'चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.

'पुष्पा' हा चित्रपट 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तीन वर्षांनी 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पाच्या भूमिकेत तर रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच छप्पर फाड कमाई केली.

Pushpa 2 Leak
Pushpa 2: टाळ्या अन् शिट्ट्यांचा जल्लोष; प्रीमियरच्या चेंगराचेंगरीत एका फॅनचा मृत्यू तर चिमुकली गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com