December Release Movies : डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा धमाका; पुष्पा, बेबी जॉन्स खिळवून ठेवणार, रिलीज डेट काय? वाचा सविस्तर

December 2024 Release Movies: डिसेंबर महिन्यात ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. 'पुष्पा 2'सह 'हे' चित्रपट प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणार आहेत.
December 2024 Release Movies
December Release MoviesSAAM TV
Published On

2024 चा शेवटचा डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली आहे. एकंदर या वर्षी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करण्यात आले. आता वर्षाच्या शेवटी देखील प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करण्यासाठी आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी चित्रपट सज्ज आहेत.

डिसेंबर महिन्यात सुपरहिट चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मेजवानीची सुरूवात या वर्षाच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ने होणार आहे.

पुष्पा 2:द रुल

अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दमदार प्रमोशन झाले आहे. तसेच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच बंपर कमाई केली आहे.

झिरो से रीस्टार्ट

विक्रांत मॅसीचा 'झिरो से रीस्टार्ट' चित्रपट 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे. विक्रांत मॅसीच्या या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. नुकतेच या चित्रपटाचे 'चल झिरो पर चलते हैं' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं आहे.

मुफासा - द लायन किंग

'मुफासा - द लायन किंग' हा अ‍ॅनिमेशन ड्रामा चित्रपट आहे. 'मुफासा - द लायन किंग' चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, आर्यन खान आणि अबराम खान यांचा आवाज आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.

विदुथलाई पार्ट 2

साउथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा 'विदुथलाई पार्ट 2' चित्रपट 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा क्राइम चित्रपट आहे. 'विदुथलाई पार्ट 1'चित्रपटाला देखाल भरपूर यश मिळाले होते.

बेबी जॉन

ख्रिसमसच्या मुहूर्तावर वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 'बेबी जॉन' हा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पोस्टर्सने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या इतर चित्रपटांची यादी

  • वनवास - 20 डिसेंबर

  • रॉबिनहुड - 20 डिसेंबर

  • मार्को - 20 डिसेंबर

  • यूआय - 20 डिसेंबर

  • सारंगपाणी जथकम - 20 डिसेंबर

  • मॅजिक - 21 डिसेंबर

  • कमाल - 25 डिसेंबर

  • बॅरोज - 25 डिसेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com