Singer Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singer Death : संगीतविश्वाला मोठा धक्का; ज्येष्ठ गायिकेचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Famous Singer Passes Away : प्रसिद्ध गायिकेचे कॅन्सरमुळे निधन झाले. संगीत विश्वावर शोककळा पसरली.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दक्षिण कोरियन गायिका ओक-ही (मूळ नाव किम ग्वांग-सुक) यांचे निधन झाले आहे. गायिकेच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायिकेची कारकीर्द जाणून घेऊयात.

Tcx.official च्या वृत्तानुसार, गायिका ओक-ही यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. गेले अनेक काळापासून त्या किडनीच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. २० जून २०२६ रोजी ग्योंग्गीमधील सुवोन येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने कोरियन संगीत विश्व आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गायिकेच्या पश्चात त्यांचा पती, मुलं असे कुटुंब आहे.

ओक-ही कोण होत्या?

ओक-ही या दक्षिण कोरियाच्या सर्वात जुन्या, लोकप्रिय गर्ल ग्रुप 'सोल सिस्टर्स'च्या गायिका म्हणून ओळखल्या जात होत्या. १९७० च्या दशकात त्यांनी आपल्या अनेक हिट गाण्यांमुळे मोठी ओळख मिळवली. त्यांन लहानपणापासून संगीताची आवड होती. त्यांचा जन्म १९५३ मध्ये बुसान येथे झाला. त्यांचे आई-वडील नाट्य कलाकार होते, त्यामुळे त्यांना कला आणि संगीताचे वातावरण वारसा म्हणून मिळाले.

'आय डोन्ट नो', 'स्पीक विथ युअर आईज', 'व्हेअर कुड यू बी', 'आह, दॅट डे', 'होल्ड बोथ माय हँड्स' आणि 'ट्रेन ऑफ लाईफ' ही त्यांची सुपरहिट गाणी आहेत. त्यांची गाणी आणि तिचा आवाज चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत राहील. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गायिकेवर श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT