Singer Death : हवेत दोन हेलिकॉप्टरची टक्कर; प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू, संगीत विश्वावर शोककळा

Famous Singer Death In Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातात प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला. संगीत विश्वावर शोककळा पसरली. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Famous Singer Death In Helicopter Crash
Singer DeathSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध गायकाचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

वयाच्या ३२ व्या वर्षी गायकाने घेतला अखेरचा श्वास

संगीत विश्वावर शोककळा

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. 'लाइफ गोज ऑन', 'व्हेन आय एम डाऊन' आणि 'मिस यू' यांसारख्या गाण्यांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक ऑलिव्हर ट्री (Oliver Tree) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ऑलिव्हर ट्री हे अमेरिकेचे प्रसिद्ध गायक होते. गायकाने वयाच्या ३२ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

tv9hindiच्या वृत्तानुसार, गायक ऑलिव्हर ट्री यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऑलिव्हर ट्री यांचा रिओ दि जानेरोमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी 14 जून 2026 ला घडला. रविवारी सकाळी रिओ दि जानेरोच्या नैऋत्य भागात झालेल्या या अपघातात दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक झाली. या अपघातात ऑलिव्हर ट्री यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. गायकाच्या मृत्यूची बातमी समजताच संगीत आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी गायकावर श्रद्धांजली वाहिली आहे.

Famous Singer Death In Helicopter Crash
Pranit More : "माझी मोठी चूक, पण..."; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेने मागितली माफी | VIDEO

ऑलिव्हर ट्री कोण?

ऑलिव्हर ट्री यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. आपल्या बाऊल कट हेअरस्टाइल आणि ८० च्या दशकातील आकर्षक फॅशनसाठी ऑलिव्हर ट्री ओळखले जायचे. त्यांनी २०१३ मध्ये आर अँड एस रेकॉर्ड्स अंतर्गत आपला पहिला ईपी, 'डेमन्स' प्रदर्शित केला. २०१६ मध्ये व्हेथनने 'व्हेन आय एम डाऊन' हे गाणे प्रदर्शित केले, या गाण्यातील सहभागामुळे ट्री प्रसिद्धीच्या झोतात आले.

ऑलिव्हर ट्री यांच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्याने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या त्याच्या 'ऑल दॅट x एलियन बॉय' या डबल म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याने त्याची रेट्रो-अनोखी शैली सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. २०२० मध्ये त्यांनी 'अगली इज ब्युटीफुल' हा पहिला स्टुडिओ अल्बम प्रदर्शित केला. 'एलियन बॉय' आणि 'लाइफ गोज ऑन' या गाण्यांसाठी ऑलिव्हर ट्री ओळखले जायचे. ऑलिव्हर ट्री यांच्या मृत्यूने संगीत विश्वावर शोककळा पसरली.

Famous Singer Death In Helicopter Crash
Mohsin Akhtar : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स पतीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; बायको आहे तरी कोण? पाहा PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com