बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स पतीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ
सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज
घटस्फोटानंतर दोन वर्षांनी नवीन संसाराला सुरूवात
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स पतीने मोहसिन अख्तरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. निकाहचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. रविवारी इन्स्टाग्रामवर मोहसिनने बायकोसोबतचे लग्नातील रोमँटिक फोटो शेअर केले. तसेच आपल्या बायकोसाठी खास मेसेज देखील लिहिला आहे. मोहसीनच्या बायकोचे नाव निधा भट्ट असे आहे.
"शुद्ध हेतू, निखळ प्रेम आणि संयम व कृतज्ञतेने भरलेले हृदय...आपला आत्मा शुद्ध ठेवा... प्रवासात स्वतःला सावरत पुढे जा आणि हा विश्वास ठेवा की अल्लाहची योजना नेहमीच सर्वोत्तम असते, त्याने ठरवलेल्या योग्य वेळी माझी पत्नी निधा भट्टसोबत भेट झाली. तू माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास. थँक्यू माय लव्ह...तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायमसोबत राहो..."
निकाहसाठी मोहसीन अख्तरने पांढऱ्या रंगाची सुंदर शेरवानी परिधान केली होती. तर निधा भट्टने आयव्हरी रंगाचा शरारा परिधान केला होता. दोघे एकत्र खूपच आनंदी आणि क्यूट दिसत होते. मोहसीनने गुडघ्यावर बसून निधाला अंगठी घातली. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली, त्यानंतर २०२४ मध्ये दोघेही वेगळे झाले. मोहसिन अख्तर हा काश्मीरमधील व्यावसायिक आणि मॉडेल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.