M Manikandan Saam Tv
मनोरंजन बातम्या

M Manikandan: 'सर तुमची मेहनत तुमचीच आहे', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी चोरी, चोरट्यांनी नॅशनल अवॉर्ड परत करत मागितली माफी

Robbers Return National Awards To Director: याप्रकरणी मणिकंदन यांनी चेन्नईच्या उसिलमपट्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेतच. अशामध्ये चोरट्यांनी मणिकंदन यांची माफी मागून त्यांना मिळालेला नॅशनल अवॉर्ड परत केला आहे.

Priya More

M Manikandan Movie:

चेन्नईमध्ये (Chennai) एक धक्कादायक घटना घडली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एम मणिकंदन (M Manikandan) यांच्या घरी मोठी चोरी झाली. मणिकंदन हे चेन्नईत आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या घरामध्ये चोरी करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या. याप्रकरणी मणिकंदन यांनी चेन्नईच्या उसिलमपट्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेतच. अशामध्ये चोरट्यांनी मणिकंदन यांची माफी मागून त्यांना मिळालेला नॅशनल अवॉर्ड परत केला आहे.

'काका मुत्ताई' आणि 'कदैसी विवाहसी' यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक मणिकंदन चेन्नईतील उसिलमपट्टी येथे कुटुंबीयांसोबत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी मोठी चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये तोडफोड करत घरातील सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केले. चोरट्यांनी त्यांना मिळालेला नॅशनल अवॉर्ड देखील चोरी केला होता. पण आता चोरट्यांनी मणिकंदन यांना माफीनाम्यासह त्यांना मिळालेल्या नॅशनल अवॉर्ड परत केला आहे.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या बातमीनुसार, एम मणिकंदन यांना मिळालेला नॅशनल अवॉर्ड त्याच्या घराच्या परिसरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सापडला. ही पिशवी मणिकंदन यांच्या कुटुंबाला त्यांच्या घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवर लटकलेल्या अवस्थेत सापडली. चोरट्यांनी या पिशवीमध्ये मणिकंदन यांना मिळालेला नॅशनल अवॉर्ड आणि माफीपत्र ठेवले होते. या पत्रामध्ये लिहिले होते की, 'भाऊ आम्हाला माफ करा. तुमची मेहनत तुमची आहे.'

मणिकंदन यांना चोरीला गेलाला नॅशनल अवॉर्ड परत मिळाला. पण चोरीला गेलेले पैसे आणि सोन्याचे दागिने अद्याप सापडले नाहीत. त्यामुळे मणिकंदन यांच्या कुटुंबात असंतोष आहे. दिग्दर्शक मणिकंदन यांच्या घरी एक पाळीव कुत्रा देखील आहे. ज्याची काळजी त्याचे मित्र घेत होते. त्याचे मित्र पाळीव कुत्र्याला खायला देण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे कळाले. या घटनेने दिग्दर्शक आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मणिकंदनचा चित्रपट प्रवास अप्रतिम आहे. 'काका मुट्टाई' या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट दिग्दर्शन कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती नंतर 'कुटरम थंडनई' आणि 'आनंदवन कट्टलई' सारख्या चित्रपटांनी वाढवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लोकसभेत गदारोळ, कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब

HBD Dhanush : साऊथचा किंग धनुष किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा वाचून डोळे भिरभिरतील

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

Today Gold Rate: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल झाला का? वाचा आजचे दर

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT