Zara Patel on Rashmika Madanna Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Deepfake Video: रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडीओतील खरी महिला आली समोर, दिली पहिली प्रतिक्रिया

Zara Patel on Rashmika Madanna Video: ब्रिटिश भारतीय महिला झारा पटेल म्हणाली की, या डीपफेक व्हिडीओच्या वादात तिची कोणतीही भूमिका नाही.

Priya More

Zara Patel First Reaction:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Actress Rashmika Mandanna) एका फेक व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) चर्चेत आहे. रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहते संताप व्यक्त करत आहेत. रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओवरून बराच वादंग निर्माण झाला आहे.

स्वत: रश्मिकाने या व्हिडीओवर आपली पहिली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. हा सर्व प्रकार भीतीदायक असल्याचे रश्मिकाने सांगितले होते. आता या डीपफेक व्हिडीओमध्ये दिसणारी खरी महिला समोर आली आहे. झारा पटेलने याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटिश भारतीय महिला झारा पटेल (Zara Patel) म्हणाली की या डीपफेक व्हिडीओच्या वादात तिची कोणतीही भूमिका नाही.

डीपफेक व्हिडीओवर झाराने पहिली प्रतिक्रिया देत सांगितले की, 'या घटनेमुळे मी खूप व्यथित झाले आहे. जर हे असेच चालू राहिले तर भविष्यात मुली आणि महिला सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास घाबरतील. नक्कीच ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.' झाराची पहिली प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या झारा पटेलच्या नावाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

झाराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'हॅलो, माझ्या लक्षात आले आहे की कोणीतरी माझ्या शरीराचा आणि बॉलिवूड अभिनेत्रीचा चेहरा वापरून डीपफेक व्हिडिओ तयार केला आहे. डीपफेक व्हिडिओशी माझा काहीही संबंध नाही आणि जे घडत आहे त्यामुळे मी खूप व्यथित आणि दुःखी झाले आहे. मला महिला आणि मुलींच्या भविष्याची काळजी वाटते ज्यांना आता सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ टाकायची आणखी भीती वाटेल. कृपया एक पाऊल मागे घ्या आणि तुम्ही इंटरनेटवर काय पाहता ते पुन्हा तपासा. इंटरनेटवरील सर्व काही खरे नाही. जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे.'

रश्मिका मंदानाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर आणि ट्विटवर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली होती यामाध्यमातून तिने नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, 'मला हे सांगताना खूप दु:ख होत आहे. पण मला ऑनलाइन पसरवल्या जाणाऱ्या माझ्या डीप फेक व्हिडीओवर बोलायचे आहे. खरे सांगायचे तर असा व्हिडीओ फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे आज लोकांचे खूप नुकसान होत आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT