Chhatrapati Shivaji Maharaj Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj Movie: 'कांतारा' फेम अभिनेता झळकणार शिवरायांच्या भूमिकेत; आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक, रिलीज डेट काय?

Rishab Shetty: 'छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात शिवरायांची भूमिका साउथ सुपरस्टार साकारणार आहे.

Shreya Maskar

'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) आता नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी हा साउथचा सुपरस्टार आहे. त्याला 'कांतारा' चित्रपटामुळे खूप लोकप्रियत मिळाली.

नुकताच 'छत्रपती शिवाजी महाराज' (Chhatrapati Shivaji Maharaj Movie) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर हा आगामी चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात शिवरायांची भूमिका साउथ अभिनेता ऋषभ शेट्टी साकारणार आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात अभिनेता ऋषभ शेट्टी शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंह करणार आहे. त्यांनी आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.

अभिनेता ऋषभ शेट्टी हा चित्रपट हिंदीसोबतच इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पोस्टला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आपला सन्मान आणि विशेषाधिकार, भारताचा महान योद्धा आणि राजाची महाकथा सादर करत आहोत - 'दी प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज' हा केवळ एक चित्रपट नाही तर संकटांशी लढा देणाऱ्या, पराक्रमी मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान देणाऱ्या आणि कधीही न विसरता येणारा वारसा तयार करणाऱ्या योद्ध्याचा गौरव करण्यासाठी ही एक लढाई आहे."

चित्रपटाच्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटात आशा भोसलेंची नात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जनाई भोसलेला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत. या चित्रपटात जनाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची म्हणजे सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT