ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Rohit sharma: टीम इंडियाने जून महिन्यात टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि सर्व भारतीयांना एक मोठ्ठं गिफ्ट दिलं. दरम्यान वर्ल्डकप कसा जिंकला आणि ऋषभ पंतची स्ट्रॅटर्जी कशी होती याबाबत रोहितने खुलासा केला आहे.
rohit shama
rohit shama saam tv
Published On

टीम इंडियाने जून महिन्यात टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि सर्व भारतीयांना एक मोठ्ठं गिफ्ट दिलं. हीच वर्ल्डकप विजेती टीम 'द ग्रेट इंडियन कपिल शो 2'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आली होती. यामध्ये तत्कालीन टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि शिवम दुबे या शोमध्ये पोहोचले होते. या शोमध्ये सर्व खेळाडूंनी मजा, मस्ती केली. दरम्यान या शोमध्ये वर्ल्डकप कसा जिंकला आणि ऋषभ पंतची स्ट्रॅटर्जी कशी होती याबाबत रोहितने खुलासा केला आहे.

कपिल शर्माच्या या शोमध्ये येण्याची रोहित शर्माची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी वनडे वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर देखील रोहित शर्मा या शोमध्ये सहभागी झाला होता. टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या तो आराम करत असून या शोमध्ये वर्ल्डकप फायनलमध्ये पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाने कशा पद्धतीने विजय मिळवला हे रोहितने सांगितलं आहे.

rohit shama
हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा केला होता पराभव

टी-२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला होता. मात्र या सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा टीम इंडियाचा फायनल सामन्यात पराभव होणार असं दिसून येत होतं. मात्र रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, ऋषभ पंतच्या एका चलाखीमुळे हा सामना भारताने जिंकला होता.

पंतच्या चलाखीने जिंकला हरलेला सामना

या शोमध्ये रोहित शर्माने सांगितलं की, ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेला ३० बॉलमध्ये ३० रन्सची गरज होती, त्यावेळी एक छोटा ब्रेक मिळाला होता. पंतने या ब्रेकचा अगदी योग्यरित्या वापर केला. यावेळी त्याने दुखापत झाल्याचं नाटक करत फलंदाजीचं रिदम डिस्टर्ब केलं. यामुळे गेम काहीसा हळू झाला आणि फलंदाजांची लय तोडण्याची आम्हाला मदत मिळाली.

rohit shama
IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

पंतच्या चतुराईमुळे जिंकलो आम्ही वर्ल्डकप

रोहितच्या मताप्रमाणे, टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठीचं हे देखील एक कारण होतं. पंतच्या चतुराईमुळे काही गोष्टी आमच्या हिशोबाने घडल्या. मात्र हे केवळ एकच कारण नव्हतं, ज्यामुळे टीम इंडिया जिंकली, असंही नंतर रोहितने स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com