IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

India vs Bangladesh 1st T20I: टेस्ट सिरीजनंतर टीम इंडिया आता बांगलादेशाविरूद्ध टी-२० सिरीज खेळणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रेस कॉन्फरेंस झाली. यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!
Published On

टेस्ट सिरीजनंतर टीम इंडिया आता बांगलादेशाविरूद्ध टी-२० सिरीज खेळणार आहे. आजपासून या टी-२० सिरीजला सुरुवात होणार असून आज संध्याकाळी ७ वाजता पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रेस कॉन्फरेंस झाली. यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

शनिवारी सूर्यकुमार यादवने असे संकेत दिलेत की, येत्या काळात त्याला आयपीएल फ्रँचायझीचे नेतृत्व करायचं आहे. दरम्यान यावेळी सूर्यकुमार काय म्हणाला ते पाहूयात.

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं. दरम्यान हा निर्णय चाहत्यांना मात्र रूचला नव्हता. दरम्यान कर्णधार केल्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीमची कामगिरी चांगली झाली नाही. अशातच गेल्या आयपीएलपासून सूर्यकुमारचा दर्जा वाढला असून आता तो टीम इंडियाचं नेतृत्व करत असल्याने यंदा मुंबई इंडियन्स काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!
हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

रोहितच्या कॅप्टन्सीवर काय म्हणाला सूर्या?

बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या सिरीजपूर्वी सूर्याला आयपीएलबद्दल विचारलं असता तो म्हणाला, 'तू गुगली टाकलीस, मी माझ्या नव्या भूमिकेचा आनंद घेतोय. मी रोहित भाईच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी खेळायचो, त्यामुळे जेव्हा जेव्हा मला माझं मत विचारलं जायचे तेव्हा मी ते सांगायचो.

टीम इंडियाला पुढे घेऊन जाणं हेच लक्ष्य

सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, भारतासाठी नेतृ्त्व करणं मला चांगलं वाटतंय. श्रीलंकेविरुद्ध कर्णधार होण्यापूर्वी मी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टीमचं नेतृत्व केलं होतं. यावेळी टीमला पुढे कसं न्यायचं हे मी इतर कर्णधारांकडून शिकलोय. आता पुढे बघूया. सध्या टीम इंडियाला पुढे नेणं हे माझं लक्ष्य असून बाकी तुम्हाला समजेलच.

युवा खेळाडूंसाठी उत्तम संधी

सूर्यकुमार यादवने म्हटलं की, बांगलादेशाविरूद्धची ही सिरीज युवा खेळाडूंसाठी चांगली संधी आहे. मयंकमध्ये सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता असून मी अजून त्याचा नेट सेशनमध्ये सामना केला नाहीये.

मयंक यादवच्या डेब्यूबाबत विचारलं असता सूर्या म्हणाला, या वेगवान गोलंदाजाला विचारले असता सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्ही सध्या फक्त टीमबाबत चर्चा केलीये. जर तुम्ही मला 10 मिनिटांनंतर विचारलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की तो खेळणार आहे की नाही.

टी-२० मध्ये ओपनिंग जोडी कशी असणार?

वर्ल्डकपनंतर भारताने श्रीलंकेविरूद्ध टी-२० सिरीज खेळली होती. वर्ल्डकपच्या विजयानंतर वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यामुळे आता ओपनिंग कोण करणार असा प्रश्न उपस्थित राहतो. यावेळी अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन डावाची सुरुवात करणार असल्याचे भारतीय कर्णधाराने सांगितले.

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!
IND vs BAN: मयांकसह या खेळाडूंना मिळणार पदार्पणाची संधी; सूर्यकुमार यादव कोणाला बसवणार?

सूर्यकुमार यादव म्हणाला, 'संजू सॅमसन या सिरीजमध्ये ओपनिंग फलंदाजाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान खेळपट्टी चांगली असून आम्ही सराव विकेटवर फलंदाजी करत आहोत. सामन्यासाठी निवडलेल्या खेळपट्टीच्या तुलनेत फारसा बदल होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com