Alia Bhatt SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt: आलियाच्या मुलीसाठी राम चरणनं दत्तक घेतला हत्ती, गिफ्ट पाठवलं घरी; अभिनेत्री म्हणाली...

Ram Charan Special Gift For Alia Daughter : साऊथ सुपरस्टार रामचरणने आलियाच्या मुलीसाठी खूप खास गिफ्ट पाठवलं आहे. याचा किस्सा आलियाने सांगितला आहे.

Shreya Maskar

आलियाने (Alia Bhatt) आपल्या अभिनयामुळे आणि लूकमुळे प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. ती नेहमी प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपटांची मेजवानी घेऊन येत असते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'जिगरा'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलियाने तिच्या सोबत घडलेला एक खास किस्सा सांगितला आहे.

आलियाने साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत(Ram Charan) RRR या चित्रपटात काम केलं होत. तेव्हापासून त्यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळते. रामचरणने आलिया आणि रणबीरच्या लेकीसाठी म्हणजे राहासाठी (Raha Kapoor) खूप खास गिफ्ट दिलं आहे. आलियाने एका मुलाखतीत सांगितलं की, "रामचरणने एक हत्ती दत्तक घेतला असून त्याने त्या हत्तीला आलियाच्या लेकीचं म्हणजे राहाचं नाव दिलं आहे.

"आलिया पुढे म्हणाली की, "राहाच्या जन्मानंतर मी घराजवळ चालत असताना अचानक माझ्याजवळ कोणीतरी आलं आणि मला म्हणाल तुमच्यासाठी रामचरण सरांनी हत्ती पाठवला आहे, हे ऐकताच मी आश्चर्यचकित झाले. मी लगेच घराजवळ गेले आणि पाहते तर काय आमच्या घराजवळ एक लाकडाचा हत्ती होता. तो खरा हत्ती नव्हता. रामचरणने दत्तक घेतल्यावर जंगलातील एका हत्तीची ती प्रतिकृती होती. त्या हत्तीला राहाचं नाव दिलं होतं. असं गिफ्ट रामचरणने आलिया आणि राहासाठी पाठवले होते. ही गोष्ट कायम माझ्या लक्षात राहील. " आलियाला ही गोष्ट खूप आवडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT