Pushpa 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Pushpa 2'साठी अल्लू अर्जुनने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा ऐकून डोळे भिरभिरतील

Allu Arjun Fees For Pushpa 2 : बहुप्रतिक्षित 'पुष्पा २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २'साठी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने किती कोटींचे मानधन घेतले जाणून घ्या.

Shreya Maskar

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun ) सध्या 'पुष्पा २' मुळे (Pushpa 2) चर्चेत आहे. आता हा चित्रपट 5 डिसेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'पुष्पा २' हिंदीसोबतच इतर सहा भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे.अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करणार आहे.

'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने किती मानधन घेतलं याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने तब्बल 300 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे समोर आले आहे. अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफीसवर जादू केली आणि बंपर कमाई केली. हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता. अल्लू अर्जुनला 'पुष्पा' नंतर विशेष लोकप्रियता मिळाली. एवढी लोकप्रियता मिळाल्यामुळे त्याच्या मानधनातही वाढ झालेली पाहायला मिळाली. 'पुष्पा' मधील अल्लू अर्जुनची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली. चित्रपटाची गाणी देखील खूप हिट झाली.

'पुष्पा २' हा 2024 चा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. 'पुष्पा २ : द रुल' ची पुष्पा पुष्पा आणि सुसेकी ही दोन्ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. 'पुष्पा २ ' मध्ये आयटम साँग करताना बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT