Pooja-Soham Bandekar Reception saam tv
मनोरंजन बातम्या

Pooja-Soham Bandekar Reception : राजकीय नेते ते मराठी कलाकारांची मांदियाळी; बांदेकरांच्या लेक अन् सुनेला आशीर्वाद द्यायला दिग्गजांची उपस्थिती-VIDEO

Soham Bandekar-Pooja Birari Wedding Reception : आदेश बांदेकरांचा लेक नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. त्याचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय नेते आणि मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.

Shreya Maskar

सोहम बांदेकरने अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्नगाठ बांधली.

नुकतेच पूजा आणि सोहम बांदेकरचा रिसेप्शन सोहळा पार पडला.

नव वधूवरस आशीर्वाद देण्यासाठी राजकीय नेते ते मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.

आदेश बांदेकरांच्या लेकाचा शाही विवाह सोहळा अलिकेडच पार पडला आहे. बांदेकरांच्या घरी सून आली आहे. सोहम बांदेकरने मराठी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्नगाठ बांधली. यांचा शाही विवाह सोहळा 2 डिसेंबरला लोणावळ्यात पार पडला. मेहंदी, संगीत, साखरपुडा, हळद आणि लग्न सर्व समारंभ थाटात पार पडले. लग्नानंतर काल (9 नोव्हेंबर 2025)ला त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले. रिसेप्शन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

नव वधूवरस आशीर्वाद देण्यासाठी राजकीय नेते ते मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. रिसेप्शनला माननीय उद्धव ठाकरे सहकुटुंबासोबत उपस्थित राहिले. तसेच संजय राऊत देखील आले होते. सोहम-पूजाने उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. यांनी छान फोटो देखील काढले. त्यांच्या भेटीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. राजश्री मराठीने पूजा आणि सोहम बांदेकरच्या रिसेप्शनचे खास व्हिडीओ शेअर केले आहेत.

मराठी कलाकारांची मांदियाळी

सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या रिसेप्शनला महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित होते. त्यासोबतच सुहास जोशी, श्रेयस तळपदे आणि त्याचे कुटुंब, अशोक शिंदे, निर्मिती सावंत, सोनाली खरे , सोनाली कुलकर्णी, अजिंक्य देव, दिग्दर्शक रवी जाधव, केदार शिंदे, आशय कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, क्रांती रेडकर असे अनेक कलाकार आले होते.

रिसेप्शन लूक

सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीने रिसेप्शनसाठी वेस्टन लूक केला होता. सोहमने निळ्या रंगाचा शानदार सूट परिधान केला होता. तर पूजा बिरारीने सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. दोघेही एकत्र खूपच खुश दिसत होते. लूकला मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअप पूजाने केला होता. सध्या कलाकार आणि चाहते त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: पंढरपुरमध्ये वाळू माफियांकडून वकिलावर जीवघेणा हल्ला, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Madhuri Dixit : कोकणात घरोघरी बनवला जाणारा 'हा' पदार्थ 'धकधक गर्ल'ला खूप आवडतो

Udadachi Amati Recipe : उडदाच्या डाळीची झणझणीत आमटी , वाचा रेसिपी

Gold Rate Today : सोन्याला पुन्हा झळाळी, अचानक किंमतीत मोठी वाढ, वाचा 22k, 24k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT