Yashraj Mukhate's Song Hit's Times Square Instagram
मनोरंजन बातम्या

Yashraj Mukhate's Song Hit's Times Square: टाइम्स स्क्वेअरवर झळकला सलीम- सुलेमानसोबत सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर, पहिल्याच गाण्याने केली जबरदस्त कामगिरी

Yashraj Mukhate's New Song: सोशल मीडियावर नेहमीच काही खास गाण्यांमुळे चर्चेत राहिलेल्या यशराजच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओने थेट जगभरातील प्रतिष्ठित बिलबोर्डवर स्थान मिळवलं आहे.

Chetan Bodke

Yashraj Mukhate's Song Hit's Times Square: ‘रसोडे में कौन था’ आणि ‘पावरी होरी है’ हे गाणं आपण अनेकदा सोशल मीडियावर ऐकलं असेल. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या गाण्याचं रिक्रिएशन यशराज मुखातेने केलं असून त्या गाण्यामुळे त्याच्या प्रसिद्धीत चांगलीच वाढ झाली आहे.

सोशल मीडियावर नेहमीच काही खास गाण्यांमुळे चर्चेत राहिलेल्या यशराजच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओने यशाचं शिखर गाठलंय. उस्ताद सलीम आणि सुलेमान मर्चंट निर्मित म्युझिक व्हिडिओ न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर प्रदर्शित झाला आहे; त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच चर्चा होत आहे.

आपल्या यशाचा आणखी एक मानाचा तुरा मिळवत यशराज मुखाते आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार सलीम आणि सुलेमान यांनी निर्मित केलेल्या पहिल्या म्युझिक व्हिडिओने जगभरातील प्रतिष्ठित बिलबोर्डवर स्थान मिळवलं आहे. यशराजचं ‘कहानिया’ या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर प्रदर्शित झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीसह सर्वत्र या गाण्याची बरीच चर्चा होत आहे. सलीम आणि सुलेमान यांच्यासोबत यशराजने गाणं तयार केलं असून ते गायलं आहे.

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर आपले गाणे दाखवल्याबद्दल यशराज मुखाते म्हणतो, “सलीम आणि सुलेमान यांच्यासोबत काम करायला मिळणं आणि त्यांच्या मर्चंट रेकॉर्ड या ब्रँडसोबत एक गाणं प्रदर्शित करायला मिळणं हे माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्या दोघांकडूनही मला खूप काही नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मला ठाऊक नव्हतं, माझ्या पहिल्याच म्युझिक व्हिडीओला इतके अद्भूत यश प्राप्त होईल. एक दिवस टाईम्स स्क्वेअरवर झळकण्याचं माझं स्वप्न होतच पण, या गाण्यानं ते खरं होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ‘कहानिया’ हे गाणं माझ्यासाठी एक संस्मरणीय गाणं असून, माझ्यासाठी ते एक यशाचं शिखर ठरलं आहे. आणि त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे.”

यशराज मुखातेसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना, सलीम आणि सुलेमान मर्चंट म्हणाले, “आम्हाला नेहमीच नव्या कलाकारांसोबत काम करायला फार आवडतं. यशराजसोबत काम करताना देखील आम्हाला खूप मज्जा आली. त्याला संगीताबद्दल असलेलं अभूतपूर्व ज्ञान, शिकण्याची उत्सुकता ही एक कौतुक करण्यासारखी होती. आम्ही जेव्हा त्याच्या वेगळ्या आणि भन्नाट रिमिक्सेस ऐकून आम्ही थक्क झालो, जेव्हा याचे गाणे ऐकले त्यावेळी मनात ठाम विचार केला की, याच्यासोबत एकदा तरी, नक्कीच काम करायचं. आमच्यासाठीही हा एक उत्तम अनुभव होता, कारण आम्ही त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. विशेष करून संगीताचे स्वर समजून घ्यायला फार आवडले. यशराजची रचना आणि गायन, शिवांशचे गीत, अंशुमनची संगीत निर्मिती आणि तुषारचे चित्रीकरण, यामुळे गाण्याला नक्कीच चार चाँद लागले. यशराजसोबत आणखी इतर गाण्यांवर व संगीत निर्मितीवर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

यशराज मुखातेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, हा एक असामान्य संगीत कलाकार असून त्याच्या गाण्यातील रिमिक्सेसने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. त्याच्या गाण्यातील कौशल्याने आणि सादरीकरणावर प्रेक्षक नेहमीच प्रभावित होतात. (Bollywood Film)

‘रसोडे में कौन था’ आणि ‘पावरी होरी है’ या दोन शॉर्ट व्हिडीओ करीता त्याला सर्वाधिक प्रसिद्धीस मिळाली. यशराजसोबत आतापर्यंत, ए.आर.रहमान, सलीम मर्चंट, जॉनी लीव्हर, लकी अली, वरुण शर्मा आणि शहनाज गिल यांसारख्या सेलिब्रिटींसोबत त्याने काम केले आहे.

कंटेंट प्रोड्युसर, म्युझिक प्रोड्युसर, म्युझिशियन आणि लिरिसिस्ट म्हणून त्याने सोशल मीडियावर त्याचे नाव कमावले. आता यशराजचे चाहते त्याच्या आगामी आणि एका भन्नाट गाण्यासाठी कमालीचे प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT