Shashank Ketkar News: ‘मला पाहण्यापेक्षा प्रेक्षक ऋतिक रोशनला...’ म्हणत शशांक केतकरने मराठी चित्रपटाविषयी मांडलं मोठं वक्तव्य

Shashank Ketkar Marathi Actor Share Payemet: नुकतंच टेलिव्हिजन अभिनेता शशांक केतकरने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या मालिकेतील मानधनावर भाष्य केलंय.
Shashank Ketkar Marathi Actor Share Payemet
Shashank Ketkar Marathi Actor Share PayemetSaam Tv
Published On

Shashank Ketkar On Bollywood Movies: मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर नेहमीच आपल्या अभिनया करिता चर्चेत असतो. शशांकने नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज या सर्वच माध्यमात त्याने काम करत आपली ओळख निर्माण केली आहे. नुकतंच अभिनेत्याने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या मालिकेतील मानधनावर भाष्य केलंय. त्याला त्याच्या स्ट्रगलच्या काळात किती मानधन मिळालं होतं, याविषयी त्याने भाष्य केले. सोबतच त्याने मुलाखतीत टेलिव्हिजनसृष्टीतील अनेक महत्वाचे खुलासे देखील केले आहेत.

Shashank Ketkar Marathi Actor Share Payemet
Vijay Varma On Tamannaah Bhatia: तमन्नाच्या २ कोटींच्या डायमंड रिंगवर विजय वर्माची प्रतिक्रिया

शशांक केतकरने ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला नुकतीच मुलाखत दिली आहे. सध्या अभिनेत्याची ही मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी अभिनेत्याला मुलाखतीत, अनेकदा सेलिब्रिटींना मालिकेत कपड्यांसाठी, जेवणासाठी, शिफ्टसाठी झगडावं लागताना तू मालिकेमध्ये कसा रमतोस?

या प्रश्नावर उत्तर देताना शशांक केतकर म्हणतो, “मला मालिकेत काम करायला फार आवडतं. मालिकेत काम करताना मला ताण घेऊन काम करायला आवडतं. सोबतच मला, सर्व गोष्टी सुरळीत असल्यातरी, मला मालिकेत आणि चित्रपटात काम करायला आवडतं.”

“पण बदलत्या काळाप्रमाणे चित्रपट मिळतील का? याची कोणतीच शाश्वती नाही. कारण शशांक केतकरचा 300 रुपयांचं तिकीट काढून लोक चित्रपट पाहायला का येतील? त्याच 300 रुपयात प्रेक्षकांना ऋतिक रोशन दिसतोय. असं परखड मत यावेळी त्याने स्पष्ट केले.”

मुलाखतीत पुढे शशांक केतकर म्हणतो, “ दक्षिण भारतात त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी फक्त त्यांचीच भाषा ठेवलीय. आपल्या सिनेसृष्टीतील कलाकारांना हिंदी, इंग्रजी आणि मराठीही येतेच. त्यामुळे आपण एकाच वेळी तीन तीन भाषा बोलतो. ३०० रुपयात एखादा गहन विषयावरील चित्रपट पाहण्यापेक्षा, मी वरुण धवनचा एखादा धमाल, टाईमपास चित्रपट बघेन. एक प्रेक्षक म्हणून हा विचार डोक्यात येणं सहाजिक आहे.”, सध्या अभिनेत्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. (Bollywood Film)

Shashank Ketkar Marathi Actor Share Payemet
Territory Motion Poster: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते "टेरिटरी" चित्रपटाचे पोस्टर लॉन्च, प्रदर्शनापूर्वीच मिळाले ‘या’ फेस्टिवलमध्ये पुरस्कार

शशांक केतकर पुढे सिनेसृष्टीत काम करून पैसे न मिळणे या मुद्द्यावर भाष्य केलं, “‘होणार सुन मी ह्या घरची’ ही माझी सहावी मालिका आहे. मालिकेमुळे आपण महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध होतात. त्यामुळे तुमची प्रसिद्धी कित्येक पटीने वाढते. मालिकेत असताना तुमच्याकडे महिन्याचे २० ते २५ दिवस काम मिळेल, याची खात्री असते.”

“टेलिव्हिजनसृष्टीत सर्वच कलाकार पर डे वर काम करतात. जेवढ्या दिवस आपण काम करतो, तितके पैसे आपल्याला मिळणार याचं गणित डोक्यात असतं. माझ्या फिल्मी करियरच्या सुरूवातीला १२०० रूपयांपासून आर्थिक मानधन मिळत होतं. आता माझं मानधन एका ठराविक मानधनापर्यंत आलं आहे. पण तितक्या पैशात माझं घर चालत नव्हतं. आता अर्थात घर, EMI हे सर्व एका पगारात चालवू शकतो.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com