Marathi Bigg Boss Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: निकालाआधीच फायनलिस्टची चर्चा, स्मिता गोंदकरच्या 'या' विधानाने वेधले लक्ष

बिग बॉसच्या घरात जाऊन आलेल्या स्मिता गोंदकरने थेट बिग बॉसच्या फायनलिस्टचेच नाव घोषित केले आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या ४ पर्वाची सध्या कमालीची चर्चा होते. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात एकूण पाच स्पर्धक आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच आरोह वेलणकर बिग बॉसच्या घरातून इव्हिक्टेड झाला.

सध्या बिग बॉसच्या घरात किरण माने, अक्षय केळकर, अपूर्वा वेलणकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंत या पाच स्पर्धकांमध्ये चुरस रंगणार आहे. हे सर्वच स्पर्धक वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांच्यातील खेळाला वेगवेगळे वळण मिळत आहे. कोणत्या वेळी स्पर्धकांमधील खेळात बदल होईल,याची कोणालाही शाश्वती नाही.

पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात वादाचे खटके उडत आहेत. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे आणि वादाचे एक वेगळेच समीकरण दिसून येते.

तब्बल १०० दिवस निखळ मनोरंजन, तितक्याच जोमात वाद आणि धम्माल मस्ती स्पर्धकांसह प्रेक्षकांनी अनुभवली. अवघ्या काही तासातच आता बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता अवघ्या महाराष्ट्राला मिळणार आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या स्पर्धकाचे नाव घेत 'बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता' म्हणून घोषणा देत आहेत. अनेकांच्या चाहत्याने त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर टॅग्जही व्हायरल करण्यासाठी सुरुवात केली आहे.

काही प्रेक्षकांशी आणि काही इंडस्ट्रीतल्या कलाकारांशी बोलल्यानंतर तीन स्पर्धकांची नावं समोर आली, ज्यात सर्वासाधारणपणे कॉमन नावं घेतली गेली ती अपूर्वा नेमळेकर,किरण माने आणि अक्षय केळकरचे. या संदर्भात बिग बॉसच्या घरात जाऊन आलेल्या स्मिता गोंदकरशी संवाद साधला होता. त्यावेळी तिने थेट बिग बॉसच्या फायनलिस्टचेच नाव घोषित केले आहे.

स्मिता गोंदकर बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धक असून पहिल्या टॉप ३ मध्ये तिने बाजी मारली होती. पुन्हा एकदा ती बिग बॉसच्या घरात गेली असून तिने यावेळी सर्वच स्पर्धकांचे टेन्शन फ्री केले आहे. स्मितानं सर्वच सदस्यांशी गप्पा मारल्या असून तिने सर्वांसोबत आपले अनुभवही शेअर केले.

त्यानिमित्तानं तिला सर्वच सदस्यांना जवळून अनुभवता आलं. घरातून बाहेर आल्यावर तिला यंदाचा विनर कोण असेल याची चर्चाही कानावर पडली. चर्चेत असलेल्या नावाची आणि असलेला तिचा अंदाज अगदी खरा ठरला.

यावेळी तिने ईसकाळशी संवाद साधला होता, तेव्हा ती म्हणते, "मी बिग बॉसच्या घरात यंदा टेन्शनमध्ये असलेल्या सदस्यांना टेन्शन फ्री करण्यासाठी गेले होते. मी प्रत्येकाला जवळून पाहिलं,अनुभवलं आणि मग घराबाहेर आल्यावर प्रत्येकाविषयी लोकांमध्ये असलेली क्रेझही पाहिली.

त्यामुळे माझ्या कानावर पडलेलं विनरचं नाव आहे अपूर्वा नेमळेकर, ज्या नावावर मी देखील माझा अंदाज बांधला होता, आणि कुठेतरी मनातूनही ते फिलिंग आहे."

आता सर्वांच्याच मनात असलेली ही अपूर्वा जिंकते का याबद्दल सर्वांचीच उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Rasta Roko : शासनाच्या १२८ कोटीच्या जीआरची होळी करत रास्ता रोको; हेक्टरी ३५ हजार देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट संजय राऊत विरोधात आक्रमक

LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Pitru Paksha 2025: श्राद्ध करताना 'या' ५ चुका टाळा नाहीतर होऊ शकतो अनर्थ

SCROLL FOR NEXT