Happy Birthday A. R. Rahman: रहमानच्या लाईफ पार्टनरच्या 'या' अटींनी आयुष्यच बदलले, आईने शोधली अशी मुलगी...

रहमानच्या जीवनात बराच संघर्षमय प्रवास असून त्याचे लव्हलाईफही बरीच रंजक आहे.
A R Rehman
A R RehmanSaam Tv
Published On

Happy Birthday A. R. Rahman: आपल्या दमदार आवाजाने जगभरात नाव कमवणारा प्रसिद्ध संगीतकार 'मोझार्ट ऑफ मद्रास' एआर रहमानचा आज वाढदिवस आहे. ए. आर. रहमान हे भारतासह परदेशात आपले नाव कमावले आहे. रहमानच्या जीवनात बराच संघर्षमय प्रवास असून त्याचे लव्हलाईफही बरीच रंजक आहे. त्याची पत्नी सायरा बानू हिच्यावर त्याचे मनापासून प्रेम आहे.

त्याने आईला लग्नासाठी दिलेल्या अटींची पूर्तता करणारी मुलगी शोधायला सांगितली होती… आणि त्याच्या लव्हस्टोरीत आणखी मजेशीर ट्विस्ट आला होता. चला तर जाणून घेऊया त्याच्या लव्हस्टोरीबद्दल...

A R Rehman
A. R. Rahman Net Worth: ए. आर. रहमानच्या आयुष्यातील 'या' आहेत खास बाबी, एका गाण्यासाठी कमावतो करोडो रुपये...

ए. आर. रहमानचे खरे नाव दिलीप कुमार असून तो ए. आर. रहमान या नावानेच जगभर ओळखला जातो. रहमानने धर्मांतर करत नाव बदलले होते. त्यावेळी तो बराच काळ चर्चेत राहिला होता. आपल्या संगीताने चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या रहमानला संगीताचा वारसा वडिलांकडूनच मिळाला होता.

त्याला संगीताचे धडे बालपणापासूनच वडिलांकडून मिळाले होते, त्याचे वडिल संगीतकार होते. त्याने लव्ह मॅरेज केले नव्हते, पण आई करीमा बेगमला पत्नी कशी हवी आहे, हे सांगितले होते.

A R Rehman
Happy Birthday A. R. Rahman: ए. आर. रहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा, परदेशात मिळाला 'हा' सन्मान...

ए. आर. रहमानने आपल्या आईला पत्नीमध्ये कोण- कोणते गुण हवे आहे, ते सांगितले. त्यातील पहिली अट, ती मुलगी सुशिक्षित असावी, कारण रहमानचं शिक्षण फक्त ग्रॅज्युएशन पर्यंत झाले होते. दुसरी अट म्हणजे, तिला संगीताची आवड असली पाहिजे आणि तिसरी अट, ती दिसायलाही सुंदर असावी.

रहमानच्या आईला या सर्व गुणांनी भरलेली मुलगी शोधणे खूप अवघड होते, कारण तिन्ही गुण एकाच मुलीत मिळणे अशक्य आहे. बराच शोध घेतल्यानंतर रहमानच्या आईने आणि नातेवाईकांनी चेन्नईतील एका व्यावसायिकाच्या घरी मुलाचे स्थळ नेले होते .

A R Rehman
Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, कोर्टाच्या 'या' निर्णयामुळे डोकेदुखी वाढणार...

त्या व्यावसायिकाला दोन मुली होत्या. ज्यांची नावं मेहर आणि सायरा बानो अशी होती. रहमानची आई मेहरला भेटायला गेल्या होत्या. योगायोग असा की, रहमानच्या आईने ते सर्व गुण सायरा बानोमध्ये पाहिले होते. त्यांनी लगेच सायरा बानूला लग्नासाठी होकार दर्शवला.

ए. आर. रहमान आणि सायरा यांनी १९९५ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या वेळी रहमान 27 वर्षांचे होते, तर सायरा यांचे वय 21 वर्ष होते. जरीही दोघांचे प्रेमविवाह नसले झाले, तरी दोघांचेही नाते तेवढेच गहिरे आहे.

A R Rehman
Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं; स्वतःही गाण्यावर थिरकल्या; VIDEO बघाच!

ए.आर. रहमानने भारतीय चित्रपटसृष्टीत संगीताला नवीन आयाम दिला आहे. ए.आर.रहमानने आपल्या सिनेकारकिर्दीत एक ऑस्कर पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन अकादमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आहेत. एआर रहमानचा चेन्नईमध्ये स्वतःचा म्युझिक स्टुडिओ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com