Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव गँगस्टर सुकेश चंद्रशेखर २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आज म्हणजेच 6 जानेवारीला अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली होती. आज न्यायालयाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी सुनावणी करण्यात आली.
सोबतच जॅकलिन फर्नांडिसने परदेशात जाण्याची याचिका मागे घेतली आहे. सुनावणी दरम्यान कोर्टाने संकेत दिले की या प्रकरणी दररोज सुनावणी घेण्याची आवश्यकता आहे.
जॅकलिन फर्नांडिसने परदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती, मात्र मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या सुनावणीत तिने परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली होती. वास्तविक ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात जॅकलिन कोर्टात पोहोचली होती.
त्यांच्या याचिकेवर येथे सुनावणी झाली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आधी आरोप निश्चित केले पाहिजेत, असे सांगितले. तुम्ही याचिका मागे घेऊ शकता. अन्यथा मी न्यायालयीन आदेश देईन. यानंतर अभिनेत्रीने तिच्या वकिलांशी बोलून न्यायालयाला सांगितले की ती सध्या आपली याचिका मागे घेत आहे..
सोबतच या प्रकरणी आज देखील पटियाला कोर्टात सुनावणी झाली. ज्यामध्ये न्यायालयाने आतापर्यंत चौकशीच्या आधारावर सर्व अहवाल कोर्टापुढे मांडण्याचा आदेश देण्यात आला. ज्यामध्ये ईडी ने कोर्टाला सांगितले की लवकरच कोर्टात एफ एस एल अहवाल मांडण्यात येईल अशाप्रकारचे अहवाल येण्यासाठी थोड़ा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणी कोर्टात युक्तिवाद करण्यात यावा. युक्तिवाद दरम्यान निश्चितपणे सर्व अहवाल कोर्टात मांडू असे कोर्टात ईडीच्या वकिलांनी सांगितले.
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचेही नाव आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून कार आणि घरासह अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप जॅकलीनवर आहे. आता ईडी आणि दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जॅकलिनने ईडीकडे केलेल्या चौकशीत कबूल केले आहे की तिने ठग सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या.
या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिससोबत नोरा फतेहीचेही नाव जोडले आहे. नोराने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात जॅकलिनविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यासोबतच नोराने या प्रकरणी अनेक मीडिया हाऊसवर मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. नोरा फतेहीने आरोप केला की, गँगस्टर सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरले गेले आहे.
सुकेशशी तिचा थेट संपर्क नव्हता, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्यामार्फत ती सुकेशला ओळखत होती. तसेच नोराने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू घेण्यास नकार दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.