Sunil Babu: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शकाचे निधन, कलाविश्वात शोककळा...

दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनिल बाबू यांचं वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालं आहे.
Sunil Babu
Sunil BabuSaam Tv
Published On

Sunil Babu: दाक्षिणात्य सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे, दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक (Art Director) सुनिल बाबू यांचं वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी काही बॉलिवूड चित्रपटासह दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. सर्वाधिक त्यांची भूमिका थलपती विजयच्या वरिसू चित्रपटामुळे चर्चेत आली होती. अंजली मेनन यांनी सुनिल बाबू यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.

Sunil Babu
Happy Birthday A. R. Rahman: ए. आर. रहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा, परदेशात मिळाला 'हा' सन्मान...

सुनिल बाबू यांच्या निधनानं दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुनील बाबूंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, तीन दिवसांआधी त्यांच्या पायाला सूज आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका सुद्धा आला होता.

Sunil Babu
Rowan Atkinson: हॉलिवूड कलाकारांनाही टाकले मागे, 'या' मुकपटाच्या राजाचा आज बर्थडे...

सुनिल बाबू यांच्या निधनाचे वृत्त कळताच दुल्कर सलमाननेही श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने सुनिल बाबूचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. दुलकर सलमानने सुनीलसोबत बंगलोर डेज आणि सीता रामम या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या दोन्ही चित्रपटांचे ते आर्ट डायरेक्टर होते आणि हे दोन्ही चित्रपट दुल्कर सलमानच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे हिट चित्रपट आहेत, ज्यात त्यांना कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे सहकार्य लाभले होते.

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्मात्या अंजली मेनन यांनीही सुनील बाबू यांना श्रद्धांजली वाहिली. इंस्टाग्रामवर त्यांनी सुनीलचा एक फोटो शेअर करत लिहिले की, 'सुनील बाबू यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप धक्का बसला आहे. आम्ही बंगलोर डेजमध्ये एकत्र काम केले आहे आणि माझ्या काही अद्भुत आठवणी आहेत ज्या मी नेहमी जपत राहीन. सुनीलच्या आत्म्याला शांती लाभो.

सुनिलने मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले. कला दिग्दर्शक साबू सिरिल यांचे सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. थुपक्की, भीष्म पर्व, महर्षी, ओपिरी, गजनी, प्रेमम, छोटा मुंबई आणि इतर अनेक चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठीही काम केले आहे.

Sunil Babu
Urfi Javed Controversy: उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांनी घेतले 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव, नेमकं काय आहे प्रकरण...

अभिनेता थलपती विजयच्या 'वारिसू' या सिनेमाची सुनील बाबू वाट पाहत होते. वारिसूसाठी सुनील बाबूने आर्ट डायरेक्शन केलं होतं. पोंगलच्या मुहूर्तावर 11 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com