Urfi Javed Controversy: उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांनी घेतले 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव, नेमकं काय आहे प्रकरण...

उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बरीच खडाजंगी रंगताना दिसून येत आहे. या प्रकरणाला आता नवं मिळण्याची शक्यता आहे.
Urfi Javed Controversy
Urfi Javed ControversySaam Tv
Published On

Urfi Javed: सध्या महाराष्ट्रात उर्फी जावेद प्रकरण कमालीचं चर्चेत आहे. उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बरीच खडाजंगी रंगताना दिसून येत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीला तिच्या कपड्यांवरून चांगलेच खडेबोल सुनावले आहे. सध्या या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं नाव पुढे केले आहे. आता नक्की या वादात नेमकं तिचं नाव कसं काय आलं? असा सवाल सर्वांनाच पडला आहे.

Urfi Javed Controversy
Urfi Javed Trolled: उर्फीही रंगली 'बेशरम रंगा'त, दीपिकानंतर तिचा भगव्या कपड्यातील 'तो' Video चर्चेत...

सोशल मीडिया आणि मुंबईच्या रस्त्यावर विचित्र कपड्यांवर फिरणाऱ्या उर्फीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलंच फटकारलं आहे. 'उर्फीला बेड्या ठोका, असा नंगा नाच महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही', अशा प्रकारे आपले स्पष्ट मत मांडत चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चित्रा वाघ यांच्या ठाम भूमिकेनंतर महाराष्ट्रातील अनेक महिला नेत्यांनी आपले मत स्पष्ट केले.

Urfi Javed Controversy
Deepika Padukone Birthday: दीपिका खाते तरी काय? मस्तानीच्या फिटनेसचं सिक्रेट उलगडलं

या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणतात, "कोणी काय कपडे परिधान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. काही कपडे ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असतील पण इतरांना ते अश्लीलपणा वाटत नसेल. त्यामुळे आयोग अशा प्रकरणात आपला वेळ वाया घालवू शकत नाही."

Urfi Javed Controversy
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उलटा चष्मा'ला अजून एक धक्का, १४ वर्षानंतर 'या' व्यक्तीने केला मालिकेला रामराम

रुपाली चाकणकरांच्या या विधानांनंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत सणकून टीका केली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी तेजस्विनी पंडित सह दिग्दर्शक संजय जाधव यांचेही नाव घेतले. सोबतच या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाने पू्र्वी केलेल्या अनेक कारवायांचा पाढा वाचून दाखवला.

Urfi Javed Controversy
Ranbir Kapoor: रणबीरच्या मोबाइल स्क्रीनवर कुणाचा फोटो? ना आलिया, ना मुलगी...

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणतात, "आमचा आजही उर्फीला विरोध नाही. विरोध आहे तिच्या कृत्याला. महाराष्ट्रात आम्ही सार्वजनिक ठिकाणी असा नंगानाच आम्ही होऊन देणार नाही. महिला आयोग त्यांचा वेळ उर्फी जावेद विरोधात कारवाई करण्यासाठी वेळ वाया घालवणार नाही. का महिला आयोगानं हात टेकले का? दुटप्पी भूमिका घेणारे महिला आयोग काय महिलांचा सन्मान राखणार. संजय जाधव दिग्दर्शित तेजस्विनी पंडितची 'अनुराधा' ही वेब सीरिज आली होती."

Urfi Javed Controversy
Shah Rukh Khan-Rishabh Pant; 'इंशाअल्लाह...' रिषभ पंतसाठी शाहरुखने मागितली दुआ

"वेब सीरिजचं पोस्टर प्रदर्शनानंतर महिला आयोगाने धुम्रपान समर्थन, अंग प्रदर्शन केले म्हणून अभिनेत्री आणि निर्मात्याविरोधात नोटीस काढली होती. सुमोटोमध्ये ट्विटरवर आलेल्या बातमीची दखल घेत अनुराधा वेब सीरिजला आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. ज्या ठिकाणी चुकीचं होत आहे, तिथे बोललंच हवं. पण इथे पोस्टर नाही तर थेट लाईव्ह शो सुरू आहे तो ही मुंबईच्या रस्त्यावर. पोस्टवर दखल घेत नोटीस पाठवू शकता तर मुंबईच्या रस्त्यावर सुरू असलेल्या नंगानाचवर कारवाई करू शकत नाही का?" असा सवाल या दरम्यान चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com