Ranbir Kapoor
Ranbir KapoorSaam Tv

Ranbir Kapoor: रणबीरच्या मोबाइल स्क्रीनवर कुणाचा फोटो? ना आलिया, ना मुलगी...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो.
Published on

मुबंई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. वैयक्तिक आयुष्यात रणबीर कपूरच्या जबाबदार आता वाढल्या आहेत. रणबीर सध्या पत्नी आलिया आणि मुलगी राहा यांच्यासोबत कौटुंबिक जीवनाचा आंनद घेत आहे.

अलीकडेच रणबीर मुबंईतील प्रोडक्शन हाऊसमध्ये स्पॉट झाला आहे.यादरम्यान सर्वांच्या नजरा तेथे ठेवलेल्या रणबीरच्या मोबाईलवरील स्क्रिन वॉलपेपरवर गेल्या आणि यामुळेच अभिनेता रणबीर कपूर चर्चेत आला आहे.

Ranbir Kapoor
Pathaan Movie Controversy: शाहरूखच्या 'पठान' चित्रपटावरून गुजरातमध्ये राडा....

अभिनेता रणबीर कपूर नुकताचं टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये उपस्थित होता. यादरम्यान पापाराझीनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. यादरम्यान त्याच्या फोनच्या स्क्रिनवरील वॉलपेपर पाहता. ज्यामध्ये ऋषी कपूर यांचा फोटो दिसला होता. ज्याला पाहून चाहते 'वाह' बेटा 'वाह' म्हणत आहेत. तू संस्कारी मुलगा आहेस. ज्याने आपल्या मोबाईल वॉलपेपरवर वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा फोटो आहे.

Ranbir Kapoor
Sonu Sood Apologises : रेल्वेने फटकारल्यानंतर सोनू सूदनं मागितली माफी; 'त्या' VIDEOमधील कोणती कृती खटकली?

३० एप्रिल २०२० रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांचे निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत असताना २ वर्षापूर्वीच त्यांनी ल्युकेमियाचा कर्करोगाने अखेर जगाचा निरोप घेतला. याचदरम्यान उपचारासाठी ते अमेरिकेतही गेले होते. मात्र कर्करोगाची त्याची लढाई अपयशी ठरली आणि एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

आलिया भट्टसोबतच्या ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले. अलिकडेच दोघेही आई-वडील झाले आहेत. अभिनेता रणबीर कपूर याला कन्यारत्न झाले आहे. त्यांच्या घरी मुलगी राहा जन्माला आली. वडीलांच्या भूमिकेतला रणबीर कपूर सध्या आनंदी आयुष्य जगत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com