Sonu Sood Apologises : रेल्वेने फटकारल्यानंतर सोनू सूदनं मागितली माफी; 'त्या' VIDEOमधील कोणती कृती खटकली?

सोनू सूदने ट्रेनमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर रेल्वेने सोनू सूदचे कान उपटले.
Sonu Sood Moving Train Viral Video
Sonu Sood Moving Train Viral VideoSAAM T
Published On

Sonu Sood Viral Video : देशावर कोरोनाचं संकट असताना हलाखीच्या परिस्थितीशी झुंजणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून जाणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्यावर देशभरातील चाहते जीव ओवाळून टाकतात. पण याच सोनू सूदनं केलेल्या कृतीमुळं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव नाही, तर टीकेचा भडीमार होत आहे.

सोनू सूदने काही दिवसांपूर्वी ट्रेनमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या या व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनानं नाराजी व्यक्त केली असून, त्याला फटकारले देखील आहे.

Sonu Sood Moving Train Viral Video
Sonu Sood: सोनू सूदने ग्रॅज्युएट चहावालीच्या आयुष्यात आणला गोडवा, बिहारच्या होतकरू तरुणीला अशी केली मदत

सोनू सूद याने १३ डिसेंबरला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ट्रेनमधील प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. सोनू सूद वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या दरवाजात बसून प्रवास करत आहे. दरवाजात बसून ट्रेनमधील प्रवासाचा आनंद लुटताना सोनू या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, अशा प्रकारे प्रवास करणे काही लोकांना खटकले.

व्हिडिओ बघा!

Sonu Sood Moving Train Viral Video
Sonu Sood Upcoming Movie: सोनू सूद दिसणार नव्या अवतारात, आगामी चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

रेल्वेने व्यक्त केली नाराजी

सोनू सूदच्या या व्हिडिओवर नॉर्थ रेल्वेने प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या कृतीमुळे रेल्वेने त्याला फटकारले आहे. ट्रेनच्या दरवाजात बसून प्रवास करणे खूपच धोकादायक आहे. सोनू सूदचा व्हिडिओ रेल्वेने रिट्विट केला आहे.

प्रिय सोनू सूद, देश आणि जगभरातील लोकांसाठी तू एक आदर्श आहेस. ट्रेनच्या दरवाजात बसून प्रवास करणे धोक्याचे आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओतून तुझ्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असं करू नकोस. सुरक्षित प्रवासाचा आनंद लुटावा, असे रेल्वेने ट्विटमध्ये म्हटले आहे. (Bollywood News)

सोनू सूदने मागितली माफी

ट्रेनमध्ये दरवाजात बसून प्रवास केल्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर रेल्वेने सोनू सूदला फटकारले. आता यावर सोनूने माफी मागितली आहे. लाखो गरीब लोक अजूनही ट्रेनच्या दरवाजात प्रवास करतात त्यांना काय वाटत असावं हे बघत होतो. माफी असावी. देशाची रेल्वे यंत्रणा उत्तम करण्यासाठी आणि हा संदेश देण्यासाठी धन्यवाद, असे सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com