Pathaan Movie Controversy
Pathaan Movie ControversySaam Tv

Pathaan Movie Controversy: शाहरूखच्या 'पठान' चित्रपटावरून गुजरातमध्ये राडा....

बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये घुसून तोडफोड केली आहे.

Protest Against Pathaan Movie: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाला रोज नवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. सेन्सॉर बोर्डच्या निर्णयानंतर चित्रपटामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता चित्रपटच्या प्रमोशन दरम्यान गुजरातमध्ये गदारोळ झाला आहे. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये घुसून तोडफोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील फाडले आहेत. तसेच त्यांनी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धकमी देखील दिली आहे.

Pathaan Movie Controversy
Deepika Padukone Birthday: बॅटमिंटन खेळाडूला मिळाली अभिनयाची साथ आणि सुरू झाला दीपिकाचा खरा जीवनप्रवास

गुजरातमधील अहमदाबादच्या अल्फावन मॉलमध्ये असलेल्या मल्टिप्लेक्समध्ये 'पठान' चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये धुमाकूळ घातला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान यासगळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते घोषणा देताना आणि चित्रपटाचे पोस्टर फाडताना दिसत आहेत. तसेच गुजरातमध्ये कुठेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र सिंह राजपूत यांनी म्हटले आहे की, 'कोणत्याही परिस्थतीत 'पठान' चित्रपटाचे स्क्रिनिंग गुजरातमध्ये होऊ देणार नाही. अहमदाबादमध्ये चित्रपटाच्या विरोधात करण्यात आलेले हे आंदोलन राज्यभरातील (गुजरातमधील) चित्रपटगृहाच्या मालकांना ताकीद आहे असे ते समजू शकतात. त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार सुद्धा करू नये.'

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठान' हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. १२ डिसेंबर २०२२ रोजी चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले होते. 'बेशरम रंग' या गाण्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com