Deepika Padukone Birthday Special: दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दीपिका तिच्या 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे चर्चेत आहे. दीपिकाने तिच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले आहे. आज दीपिकाचा वाढदिवस आहे. तिच्या या खास दिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयीची खास माहिती.
आज दीपिका ३७ वा वाढदिवस आहे. दीपिका पदुकोणचा जन्म डेनमार्क येथे ५ जानेवारी १९८६ साली. दीपिकाचा जन्म कोंकणी कुटुंबात झाला आहे. दीपिकाचे पालक बंगलोरला शिफ्ट झाले होते. दीपिका प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोन यांची मुलगी आहे.
दीपिकाने तिचे शालेय शिक्षण बंगलोरमधील सोफिया शाळेतून पूर्ण केले आहे. त्यानंतर दीपिकाने ओपन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला. तिने सोशिओलॉजी शिकण्यासाठी प्रवेश देखील घेतला होता. परंतु मॉडेलिंगमुळे दीपिका तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही.
दीपिकाने लिरिल साबणाच्या जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर ती लॅक्मे फॅशन वीकचा भाग झाली. 2006 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनून ती चर्चेत आली. मॉडेलिंग जगतात नाव कमावल्यानंतर दीपिका हिमेश रेशमियाच्या 'नाम है तेरा' या गाण्यात दिसली होती. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
अभिनयाचे बारकावे शिकण्यासाठी दीपिकाने अनुपम खेर यांच्या फिल्म अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा फराह खानची नजर तिच्यावर पडली आणि तिला 'ओम शांती ओम' चित्रपटामध्ये काम मिळाले मध्ये घेतले. शाहरुख खानसोबतचा 'ओम शांती ओम' हा दीपिकाचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. त्यांचा हा चित्रपट हिट झाला होता. आता दीपिका पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत 'पठान' चित्रपटात दिसणार आहे.
अभिनेत्री असल्याने दीपिकाचे वैयक्तिक आयुष्य देखील खूप चर्चेत असते. दीपिकाच्या गालावरील खळीने अनेकांना तिच्या प्रेमात पडले. दीपिकाच्या रिलेशनशिपच्या अनेक व्हायरल झाल्या होत्या. दीपिका एकेकाळी तिचा को-स्टार रणबीर कपूरच्या सुद्धा प्रेमात होती. तिने आरके असं टॅटू देखील काढला होता पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर दीपिका रणवीर सिंगच्या प्रेमात पडली आणि 2018 साली दोघांनी लग्न केले.
बॉलिवूडबरोबर दीपिकाने हॉलिवूडमध्येही स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. ती विन डिझेलसोबत दिसली होती. याशिवाय तिने कान्स आणि इतर आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरही आपली हजेरी लावली. दीपिकाला फिफामध्ये सहभागी होण्याचा बहुमान देखील मिळाला होता.
दीपिकाने नुकताच तिचा स्किन केअर ब्रँड लॉन्च केला आहे. तिचा 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यानंतर ती हृतिक रोशनसोबत 'फाइटर' चित्रपटामध्ये दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.