Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उलटा चष्मा'ला अजून एक धक्का, १४ वर्षानंतर 'या' व्यक्तीने केला मालिकेला रामराम

'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या अजून एक संकट आले आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv
Published On

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Update:तारक मेहता उलटा चष्मा ही मालिका गेली १४ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे या मालिकेशी एक वेगळेच नाते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना जवळचे वाटते. परंतु गेल्या काही वर्षात या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून गेले आहेत. प्रेक्षक अजूनही त्याच्या परतण्याची वाट पाहत आहेत. अशातच आता या मालिकेला अजून एक मोठा धक्का बसला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Ranbir Kapoor: रणबीरच्या मोबाइल स्क्रीनवर कुणाचा फोटो? ना आलिया, ना मुलगी...

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे दिग्दर्शक मालव राजदा यांनी या मालिकेला रामराम केला आहे. मालव यांनी 15 डिसेंबर रोजी शेवटचा शो दिग्दर्शित केला. दिग्दर्शक मालव आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद होते. याच कारणामुळे त्यांनी हा शो सोडला आहे. मात्र, याबाबत दिग्दर्शक मालव राजदा यांना विचारले असता त्यांनी या सर्व गोष्टींना नकार दिला.

या संपूर्ण प्रकरणावर मालव राजदा यांनी सांगितले की, 'तुम्ही चांगले काम करत असाल तर टीममध्ये असे क्रिएटिव्ह मतभेद असणे स्वाभाविक आहे, हे सर्व शो चांगले करण्यासाठी केले जाते.' तसेच प्रॉडक्शन हाऊससोबत मतभेद असल्याचेही त्यांनी नाकारले आहे. यासोबतच मालव यांनी मालिकेचे निर्माते असित भाई यांचे आभारही व्यक्त केले आहेत.

मालव राजदा यांनी काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांच्यासोबतच एक फोटो शेअर केला होता. तेव्हा असे म्हटले जात होते की शैलेश लोढानंतर मालव राजदा देखील शो सोडणार आहेत. तेव्हा पसरलेली ही बातमी खरी ठरली आहे.

मालव राजदा आधी अनेक स्टार्सने हा शो सोडला आहे, त्यामुळे या शोला खूप धक्का बसला आहे. मालवच्या आधी टप्पू म्हणजेच राज अनादकट, शैलेश लोढा आणि दिशा वकानी यांनीही या शोला अलविदा केला आहे. या सर्वांच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com