Mumbai Mafia: पुन्हा एकदा प्रेक्षकांना 'मुंबईच्या माफिया'चा दरारा अनुभवता येणार

गँगस्टर्सच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्याच्या रिअल लाईफमधील काही खास पैलू त्या चित्रपटांमध्ये उलगडले आहेत.
Mumbai Mafia
Mumbai MafiaSaam TV
Published On

Mumbai Mafia: राज्यासह देशातील अनेक गँगस्टर्सच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्याच्या रिअल लाईफमधील काही खास पैलू त्या चित्रपटांमध्ये उलगडले आहेत. यामध्ये गॉडफादर, डी कंपनी, शूट आउट एट लोखंडवाला, वन्स अपोन अ टाइम इन मुंबई यासारख्या काही चित्रपटांचा समावेश होता.

दाऊदचे नाव जगभर प्रसिद्ध असून त्याच्या नावाचा दरारा अजूनही कायम आहे. लवकरच त्याच्या जीवनावर आधारित एक नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mumbai Mafia
Urfi Javed: उर्फीनं तर कहरच केला, 'जबरा' फॅनची इच्छा केली पूर्ण; बोल्ड व्हिडिओ शेअर केल्यानं सगळेच हैराण

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दाऊदच्या जीवनावर एक वेब सीरिज येत आहे. या वेब सीरिजचं नाव 'मुंबई माफिया: पोलीस वर्सेस द अंडरवर्ल्ड' असे आहे. आता पर्यंत प्रत्येक चित्रपटातून जीवनातील वेगवेगळे पैलू उलगडले आहेत. पण नेटफ्लिक्स या ओटीटीवर दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित एक नवी कोरी डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'मुंबई माफिया: पोलीस वर्सेस द अंडरवर्ल्ड' या डॉक्युमेंट्रीमध्ये दाऊदचं बँकग्राऊंड, त्याच्याशी जोडलेल्या क्राइम स्टोरी आणि अनेक वाद विवाद दाखवण्यात आले आहेत.

Mumbai Mafia
Happy Birthday A. R. Rahman: रहमानच्या लाईफ पार्टनरच्या 'या' अटींनी आयुष्यच बदलले, आईने शोधली अशी मुलगी...

डॉक्युमेंट्रीचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर पुन्हा सिनेमासारखं काहीतरी पाहायला मिळेल असं वाटलं होतं मात्र ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या डॉक्युमेंट्रीची उत्सुकता वाढली.ट्रेलरमध्ये त्याच्या आयुष्यातील काही सत्य घटना दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ट्रेलरची सुरुवातच मुंबईतील काही क्राईमने होते. 90च्या दशकातील अनेक लोक दाऊदबद्दल आणि त्यांच्या आतंकवादाबद्दल सविस्तर माहिती सांगताना दिसत आहेत.

ट्रेलर शेअर करत निर्माते म्हणतात, 90च्या दशकात मुंबई क्राइम आणि गँगस्टरच्या आतंकवादानं भयभीत होती. कायदा आणि अंडरवर्ल्ड यांच्यात लढत सुरू असलेल्या त्या काळात पुन्हा जाऊया. त्यासाठी नेटफ्लिक्सवर मुंबई माफिया रिलीज होत आहे. त्यानुसार 6 जानेवारीला मुंबई माफिया नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. राघव डार आणि फ्रांसिस लॉग्नहर्स्ट यांनी डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com