सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड गायक यासेर देसाई (Yasser Desai) यांचा वरळी सी लिंकवरचा (Bandra–Worli Sea Link ) स्टंट व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये देसाई वरळी सी लिंकच्या कठड्यावर चढताना दिसत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सोमवारी सकाळी यासेरने वरळी सी लिंकवर जाऊन हा स्टंट केला आहे. या प्रकरणात आता पोलीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गायक यासर देसाईच्या अडचणी वाढल्या आहे. वरळी सी लिंकच्या काठावर चढून जीवघेणा स्टंट केल्यामुळे त्याच्या विरोधात पोलीसांनी मोठी ॲक्शन घेतली आहे. गायक यासर देसाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजताच्या सुमारास साक्षीदारांनी देसाई आणि इतर तिघांना पुलावर पाहिले. यासर देसाईने स्टंट केल्यानंतर ती लोक तिथून निघून गेली. वांद्रे पोलिसांकडे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ देखील आहे. जवळच्या टोल बूथवर कैद झालेल्या त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून पोलीस त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, यासर देसाई आणि व्हिडिओ शूट करणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप तिघांना अटक केलेली नाही. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम 285, 281, 125, 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.