SHANKAR MAHADEVAN BUYS MG M9 ELECTRIC MPV PRICE, FEATURES & LUXURY DETAILS 
मनोरंजन बातम्या

Shankar Mahadevan: शंकर महादेवन यांनी घेतली भारतातील टॉप इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत, भन्नाट फिचर्स आणि खासियत

Electric Car India: प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी अलीकडेच नवीन इलेक्ट्रिक कारची खरेदी केली असून, तिच्या डिलिव्हरीचा खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी आनंद वाटला.

Dhanshri Shintre

प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांनी नुकतीच आपली नवीन आलिशान कार MG M9 MPV खरेदी केली आहे. ही सात सीट असलेली इलेक्ट्रिक कार अलीकडेच भारतात लाँच करण्यात आली असून तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹६९.९० लाख आहे. शंकर महादेवन कारची डिलिव्हरी घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे आणि चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये शंकर महादेवन त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या नव्या MG M9 मध्ये बसताना दिसतात. व्हिडिओमध्ये शंकर आणि त्यांची पत्नी मागच्या सीटवर बसून कारचा आलिशान अनुभव घेताना दिसतात. तर त्यांची मुले पुढच्या सीटवर एमजीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारमधील मॉडर्न फीचर्स जाणून घेत आहेत.

मॉडर्न आणि प्रीमियम लूक

डिझाइनच्या बाबतीतही ही कार प्रभावी आहे. MG M9 मध्ये बोल्ड फ्रंट एंड डिझाइन असून, त्यात ट्रॅपेझॉइडल मेश ग्रिल, स्प्लिट एलईडी हेडलाइट्स आणि कनेक्टेड डेसाईन रनिंग लाइट्स दिल्या आहेत. ज्यामुळे गाडीला मॉडर्न आणि प्रीमियम लूक मिळतो. व्हिडिओमध्ये दिसते की शंकर महादेवन यांनी मेटल ब्लॅक रंगातील कारची निवड केली आहे. ही MPV आणखी दोन ड्युअल-टोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. काळ्या छतासह पर्ल व्हाइट आणि काळ्या छतासह काँक्रीट ग्रे उपलब्ध आहे.

कारच्या आत मसाज सीट्स

कारच्या इंटिरियरबाबत बोलायचे झाले तर, MG M9 मध्ये अत्याधुनिक आणि आरामदायी फीचर्सचा समावेश आहे. यात १६-मार्गांनी अॅडजस्ट होणाऱ्या सीट्स, आठ मसाज मोड्स, सीट हीटिंग आणि व्हेंटिलेशन तसेच यॉट-स्टाइल ड्युअल सनरूफ दिलेले आहेत. ६४-रंगी अॅम्बियंट लाइटिंगमुळे इंटिरियर अधिक आकर्षक दिसतो. संगीत प्रेमींसाठी विशेष बाब म्हणजे या MPV मध्ये सबवूफरसह १३-स्पीकर ऑडिओ सिस्टम अॅम्प्लिफायरसह दिलेला आहे. ज्याचा उच्च दर्जाचा साउंड अनुभव मिळतो. या सर्व आरामदायी आणि लक्झरी वैशिष्ट्यांमुळेच शंकर महादेवन यांनी ही कार निवडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

रेंज आणि चार्जिंग

शक्तीच्या बाबतीतही ही कार तितकीच सक्षम आहे. MG M9 मध्ये ९० किलोवॅट क्षमतेची एनएमसी बॅटरी देण्यात आली आहे. जी २४५ एचपी पॉवर आणि ३५० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही MPV ५४८ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. कंपनी या कारसोबत ११ किलोवॅट क्षमतेचा वॉल बॉक्स चार्जर आणि ३.३ किलोवॅटचा पोर्टेबल चार्जर देखील पुरवते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे MG M9 ही केवळ एक कार नसून आराम, लक्झरी आणि परफॉर्मन्स यांचा परिपूर्ण संगम ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT