Instagram New Feature: इन्स्टाचं भन्नाट फीचर! कोणत्या दिवशी कोणता रील पाहिला? यूजर्सला मिळणार A TO Z माहिती

Watch History Feature: इन्स्टाग्रामच्या नव्या फीचरमुळे आता एखादी जुनी आवडती रील सहज शोधता येईल. वॉच हिस्ट्रीतून यूजर्स पूर्वी पाहिलेल्या रील्स पटकन पाहू शकतात. तासंतास स्क्रोलची गरज नाही.
INSTAGRAM LAUNCHES WATCH HISTORY FEATURE TO LET USERS REWATCH REELS EASILY
INSTAGRAM LAUNCHES WATCH HISTORY FEATURE TO LET USERS REWATCH REELS EASILY
Published On
Summary
  • इन्स्टाग्रामने नवीन वॉच हिस्ट्री फीचर लाँच केले.

  • यूजर्सना पूर्वी पाहिलेले सर्व रील्स पुन्हा पाहता येतील.

  • तारीख, आठवडा आणि महिन्यानुसार रील्स फिल्टर करता येतील.

  • हे फीचर टिकटॉकपेक्षा अधिक प्रायव्हसी आणि नियंत्रण देते.

इन्स्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक उपयुक्त फीचर लाँच केले आहे. या नव्या “वॉच हिस्ट्री” फीचरमुळे यूजर्सना आता त्यांचे आवडते रील्स सेव्ह किंवा डाउनलोड करण्याची गरज राहणार नाही. कारण हे फीचर यूजर्सना त्यांनी पूर्वी पाहिलेले सर्व रील्स एकाच ठिकाणी पुन्हा पाहण्याची सुविधा देते. त्यामुळे यूजर्सना तासन्तास रील्स शोधण्यात वेळ घालवावा लागणार नाही.

इन्स्टाग्रामच्या माहितीनुसार, हे फीचर यूजर्सच्या प्रोफाइलमधील “सेटिंग्ज” आणि त्यातील “तुमची अ‍ॅक्टिव्हिटी” विभागात उपलब्ध असेल. इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी म्हणाले की, अनेक यूजर्सना लाईक केलेल्या किंवा आवडलेल्या रील्स पुन्हा सापडत नसल्यामुळे होणाऱ्या अडचणींना हे फीचर उत्तर देईल. वॉच हिस्ट्री फीचरमुळे यूजर्सना तारीख, आठवडा किंवा महिना यानुसार रील्स फिल्टर करून पाहण्याची सुविधा मिळेल.

INSTAGRAM LAUNCHES WATCH HISTORY FEATURE TO LET USERS REWATCH REELS EASILY
Jio Cheapest Plan: जिओचा स्वस्तात मस्त प्लॅन, दररोज २ जीबी डेटा अन् बरंच काही...

हे फीचर TikTok च्या वॉच हिस्ट्रीसारखे आहे. यूजर्स केवळ तारखेनुसार किंवा क्रिएटरनुसारच रील्स पाहू शकत नाहीत, तर त्यांना कालक्रमानुसार किंवा उलट क्रमाने ब्राउज करण्याचाही पर्याय असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रायव्हसीनुसार यूजर्स आपल्या हिस्ट्रीमधून कोणताही रील कधीही हटवू शकतात.

INSTAGRAM LAUNCHES WATCH HISTORY FEATURE TO LET USERS REWATCH REELS EASILY
WhatsApp Account: आता एक WhatsApp अकाउंट चार डिव्हाइसवर चालेल, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

मेटाकडून हे अपडेट रील्स प्लॅटफॉर्म मजबूत करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे. मागील काही महिन्यांत इन्स्टाग्रामने रील सिरीज लिंकिंग आणि “पिक्चर-इन-पिक्चर” मोडसारखी अनेक आकर्षक फीचर्स सादर केली होती. आता वॉच हिस्ट्री फीचरमुळे रील पाहण्याचा अनुभव अधिक वैयक्तिक, सोपा आणि सुलभ होणार आहे. या नव्या अपडेटमुळे इन्स्टाग्राम यूजर्सचा सहभाग वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com