Arijit Singh 
मनोरंजन बातम्या

Arijit Singh : शूटिंगदरम्यान हाणामारी अन् अंगठी चोरल्याचा आरोप; अरजित सिंहविरोधात पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

Singer Arijit Singh Police Complaint : गायक अरिजित सिंहविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शूटिंग दरम्यान हाणामारी अन् अंगठी चोरल्याचा आरोप अरिजित सिंह आणि त्याच्या बॉडीगार्डवर करण्यात आला आहे.

Shreya Maskar

लोकप्रिय गायक अरिजित सिंह अडचणीत सापडला आहे.

पोलीस ठाण्यात अरिजित सिंह त्याच्या बॉडीगार्डविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शूटिंग दरम्यान हाणामारी अन् अंगठी चोरल्याचा आरोप अरिजित सिंह आणि बॉडीगार्डवर करण्यात आला आहे.

लोकप्रिय गायक अरिजित सिंहच्या (Arijit Singh) अडचणी वाढल्या आहेत. अरिजित सिंह कायदेशीर अडचणीत सापडला आहे. पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन पोलीस ठाण्यात अरिजित सिंह आणि त्याच्या बॉडीगार्डविरुद्ध स्थानिक व्यक्तीला मारहाण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. शांतिनिकेतनमधील सुभाष पल्ली येथील रहिवासी कमलाकांत लाहा नावाच्या व्यक्तीने ही तक्रार केली आहे. 13 ऑगस्ट रोजी अरिजित सिंहच्या बॉडीगार्डने त्यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गायक अरिजित सिंह शांतिनिकेतनमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी सुभाष पल्ली येथील रहिवासी कमलाकांत लाहा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात होते. अरिजित सिंहच्या बॉडीगार्डने त्यांना थांबवले. यात त्यांना बॉडीगार्ड ओढले, छळ केला आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत कमलाकांत बाबूची सोन्याची अंगठीही हरवली. बॉडीगार्डने कमलाकांत यांना वाटेत थांबवले, त्याच्या गाडीची चावी आणि हेल्मेट हिसकावून घेऊन ढकलले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. तसेच कमलाकांत यांनी सांगितले की, "मी माझ्या कामावर जात होतो. रस्ता जाम होता. मी घाईत होतो. मी दिशा विचारली. अरिजित सिंहच्या बॉडीगार्डने मला ५ मिनिटे थांबण्यास सांगितले. मी उभा राहिलो. खूप उशीर झाला होता म्हणून मी पुन्हा दिशा विचारली. मग त्यांनी मला ३० मिनिटे थांबावे असे सांगितले लागेल. मी कामाच्या दबावाखाली होतो. मी निघणारच होतो, तेव्हा त्यांचे बॉडीगार्ड आले आणि माझा हात धरून पोलिसांच्या गाडीत ठेवले. त्यांनी मला त्रास दिला. माझी अंगठी हरवली."

प्रसिद्ध गायक अरिजित सिंहचे गेल्या काही महिन्यांपासून शांतिनिकेतनमध्ये शूटिंगसाठी येत आहे. अरिजित सिंहच्या शूटिंगदरम्यान स्थानिक रहिवाशांना झालेल्या छळाबद्दल सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण मिटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घाटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेली पाच दिवसांपासून ठोकले ग्रामस्थांनी कूलूप

Diabetes complications: या 6 अवयवांवर मधुमेहाचा होतो गंभीर परिणाम, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता; राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार?

केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

SCROLL FOR NEXT