Santosh Juvekar - Akshaye Khanna
Santosh JuvekarSAAM TV

Santosh Juvekar: ट्रोलिंगनंतरही संतोष जुवेकर पुन्हा बरळला; म्हणाला- "मी तिकडे बघितलंच नाही, बघूच शकलो नाही..."

Santosh Juvekar - Akshaye Khanna : संतोष जुवेकर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'छावा'च्या रिलीजनंतर त्याने अक्षय खन्नाबद्दल एक वक्तव्य केले होते. तेच वाक्य तो आता पुन्हा एका मुलाखतीत म्हणाला आहे.
Published on
Summary

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर पुन्हा चर्चेत आला आहे.

संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपटात रायाजीच्या भूमिकेत झळकला.

पुन्हा एकदा संतोष जुवेकर अक्षय खन्नाबद्दल तेच वाक्य बोलला आहे.

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) 'छावा' (Chhaava) चित्रपटानंतर खूप चर्चेत आला. 'छावा' चित्रपटात संतोष जुवेकर रायाजीच्या भूमिकेत झळकला होता. त्याने अक्षय खन्ना विषयी केलेले वक्तव्य आजही चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी यासाठी संतोष जुवेकरला खूप ट्रोल देखील केले. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये लिहिलं की,"आपला रोल किती आणि आपण बोलतो किती..."

'छावा' रिलीज झाल्यानंतर मराठी अभिनेता संतोष जुवेकरने अक्षय खन्नाबाबत एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे तो चांगलचा ट्रोल देखील झाला. आता पुन्हा एकदा संतोष जुवेकर त्याच वाक्यामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत संतोष जुवेकर पुन्हा तेच वाक्य म्हणाला की, "मी अक्षय खन्नाकडे बघितलंही नाही, मी बघूच शकलो नाही..."

मुलाखतीत संतोष जुवेकरला ट्रोलिंगवर प्रश्न केला. तेव्हा अभिनेता म्हणाला की, "मी अक्षय खन्नाकडे बघितलंही नाही, मी बघूच शकलो नाही... मी काहीही हँडल नाही केलं...जे मला ओळखतात, माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी नेमका कसा आहे हे माहित आहे. त्या लोकांनी हे सर्व हँडल केले. त्यांना मी आय लव्ह यू म्हणेन...कारण त्यांनी मला सांभाळले. आपले कौतुक करणारे आणि निंदा करणारे लोक देवच तयार करतो. पण जेव्हा त्याला कळते की हे अती होत आहे. तेव्हा तो आपल्याला कव्हर करायला सैन्य पाठवतो. मी खूप सकारात्मक आहे. मी माझे काम करतो राहीलो. माझ्या जवळच्या माणसांनीच सगळे नीट हाताळले."

आधीच्या एका मिडिया मुलाखतीत संतोष जुवेकर म्हणाला होता की, "मी मुघलांच्या भूमिका साकारणाऱ्या कोणाशीच शूटिंग सुरू असताना बोलो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. तेव्हा अक्षय खन्ना बाजूला बसला होता. तेव्हा मी अक्षय खन्नाकडे बघितलं पण नाही. माझा अक्षय खन्नावर राग नाही. त्याने चित्रपटात उत्तमच काम केले आहे."

Santosh Juvekar - Akshaye Khanna
Coolie Cast Fees : रजनीकांत ते आमिर खान, 'कुली' चित्रपटासाठी कोणी किती घेतलं मानधन?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com