Lagna Kallol Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lagna Kallol Trailer: कल्लोळ घालायला येतोय ‘लग्न कल्लोळ’, नात्यावर भाष्य करणारा ट्रेलर पाहिलात का?

Lagna Kallol Film: लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Lagna Kallol Official Trailer Out

मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. (Bollywood)

मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे. तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi Actors)

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. (Marathi Actress)

लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला १ मार्चला मिळणार आहे. हा एक रॅामकॅाम चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावा. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. (Marathi Film)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, “कला क्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी, हे आधीपासूनच मनात होते. त्यातूनच ‘लग्न कल्लोळ’ची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोत्कृष्ट अशी टीम लाभली. हा रॅामकॅाम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच हसवेल. सोबतच यात भावनाही आहेत.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

Accident News : मालवाहू गाड्यांची समोरासमोर धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; भाजपने पाडले खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

Maharashtra Politics: ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT