Yasir Hussain: पाकिस्तानी अभिनेत्याने विष ओकलं, भारतीय TV Show विषयी विखारी बोलला

Yasir Hussain On Indian TV Show: समथिंग हाऊटला दिलेल्या मुलाखतीत यासिरने पाकिस्तानी टेलिव्हिजन शोवरही टीका केली. 'आपल्या मुलाने या इंडस्ट्रीमध्ये यावे असे मला अजिबात वाटत नाही.', असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.
Yasir Hussain
Yasir HussainSaam Tv
Published On

Yasir Hussain:

पाकिस्तानी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि होस्ट यासिर हुसैन (Yasir Hussain) सध्या चर्चेत आला आहे. यासिरने भारतीय टीव्ही मालिकांबद्दल भाष्य केले आहे. त्याने सासू आणि सून यांच्यावर आधारित शोचे वर्णन निकृष्ट असे म्हटले आहे. त्याचसोबत त्याने भारतीय टीव्ही शोवर टीका करत त्यांना 'विषारी' म्हटले आहे. समथिंग हाऊटला दिलेल्या मुलाखतीत यासिरने पाकिस्तानी टेलिव्हिजन शोवरही टीका केली. 'आपल्या मुलाने या इंडस्ट्रीमध्ये यावे असे मला अजिबात वाटत नाही.', असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.

जावेद इक्बालला दिलेल्या मुलाखतीत यासिर हुसैनने पाकिस्तानी इंडस्ट्रीबद्दल बोलला. यावेळी त्याने सांगितले की, 'आमची इंडस्ट्री चांगली नाही. माझ्या मुलाने या इंडस्ट्रीत यावे असे मला वाटत नाही. हे काम आहे का? अभिनेत्याचे काम चांगले अभिनय करणे असते. हे असे क्षेत्र आहे जिथे तुम्ही तुमच्या कलेचा प्रचार केला पाहिजे. पण तुम्हाला सतत वाईट कामाची ऑफर दिली जात आहे.'

Yasir Hussain
Pulkit Samrat And Kriti Kharbanda: ठरलं तर मग! क्रिती खरबंदा - पुलकित सम्राट मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात, तारीख आली समोर

या मुलाखतीमध्ये यासिरला पाकिस्तानी टीव्ही शो भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये हिट होतात असे होस्टने सांगितले. यावर मत मांडताना यासिरने सांगितले की, 'तुम्ही भारतीय टीव्ही शो पाहिले आहे का? म्हणजे ज्या देशात कमी दर्जाचे शो आहेत ते नक्कीच आपले शो बघतात. त्याच्याशिवाय तुमचे शो कोण बघते? तुमचे शो फक्त तेच लोक पाहतात ज्यांच्याकडे स्वतःचे कोणतेही चांगले शो नाहीत. भारतात विषारी शो खूप आहेत. आमचे शो त्यांच्यापेक्षा चांगले आहे म्हणूनच ते बघत आहेत.'

Yasir Hussain
Nora Fatehi: स्टंट करताना धाडकन पडली नोरा फतेही, BTS VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

यासिरने भारतीय कंटेटवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी त्याने शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचे पुनरावलोकन केले होते आणि त्याला 'स्टोरीलेस व्हिडिओ गेम' म्हटले होते. इन्स्टाग्राम स्टोरीजवर त्याने पोस्ट केले होते. 'तुम्ही मिशन इम्पॉसिबल 1 पाहिला असला तरीही, शाहरुख खानचा पठान हा एक कथा आणि व्हिडिओ गेमपेक्षा अधिक काही वाटत नाही.', असे मत त्याने व्यक्त केले होते.

Yasir Hussain
Shivrayancha Chhava Collection: 'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक, ४ दिवसांत केली बक्कळ कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com