Nora Fatehi: स्टंट करताना धाडकन पडली नोरा फतेही, BTS VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

Nora Fatehi Falls Badly: नोरा फतेही आणि विद्युत जामवाल लवकरच त्यांचा आगामी चित्रपट 'क्रॅक'च्या (Crakk Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सध्या नोरा आणि विद्युत या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे.
Nora Fatehi Video
Nora Fatehi VideoSaam Tv
Published On

Nora Fatehi Viral Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आली आहे. नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्टंट करताना नोरा फतेही जमिनीवर धाडकन पडली. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. नोरा फतेही यावेळी अभिनेता विद्युत जामवालसोबत स्टंट करत होती.

नोरा फतेही आणि विद्युत जामवाल लवकरच त्यांचा आगामी चित्रपट 'क्रॅक'च्या (Crakk Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सध्या नोरा आणि विद्युत या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये नोरा फतेही विद्युत जामवालसोबत जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे. या चित्रपटातील बरेच स्टंट नोरा फतेही स्वत:च करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी विद्युतसोबत स्टंट करताना नोरा फतेही जमिनीवर जोरात पडली.

नोरा फतेहीने स्वत:च आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नोरा फतेही आणि विद्युत जामवाल पायामध्ये रोलर स्केट्स घालून स्टंट करताना दिसत आहे. विद्युतने नोराला एका रस्सीच्या सहाय्याने बांधले आहे. विद्युत पुढे स्केटिंग करताना दिसत आहे. तर त्याच्या मागे नोरा देखील स्केटिंग करत येताना दिसत आहे. पण यावेळी विद्युत खूप फास्ट पुढे निघून जातो. त्यामुळे ही रस्सी जोरात खेचली जाते. यावेळी नोराचा तोल जातो आणि ती जमिनीवर जोरात आपटते.

नोरा इतक्या जोरामध्ये पडते की, शूटिंगवेळी उपस्थित असलेले सर्वजण तिच्या दिशेने धावत जातात. यावेळी विद्युतला देखील मोठा धक्का बसतो. त्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम नोराला उचलण्यासाठी जाते. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसतो. या व्हिडीओवर कमेंट्स करत नोराच्या चाहत्यांनी तिला सुपरवुमन आणि प्राऊड गर्ल असे देखील म्हटले आहे.

Nora Fatehi Video
Pulkit Samrat And Kriti Kharbanda: ठरलं तर मग! क्रिती खरबंदा - पुलकित सम्राट मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात, तारीख आली समोर

नोरा फतेहीच्या लूकबद्दल सांगायचे झाले तर, नोराने यावेळी डेनिम शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे. हाय पोनीटेल आणि कानामध्ये हूप्स घातलेल्या नोरा खूपच सिझलिंग दिसत आहे. तिच्या या लूकला खूप चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान क्रॅक चित्रपटामध्ये नोरा फतेही, विद्युत जामवालसोबत अर्जुन रामपाल, एमी जॅक्सन आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. या सेलिब्रिटींचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Nora Fatehi Video
Sangharsh Yodha Movie: मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर आधारित 'संघर्षयोद्धा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, २६ एप्रिलला होणार रिलीज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com