पूनम पांडे तिच्या मृत्यूबाबतच्या पोस्टनंतर नेहमीच चर्चेत राहत आहे. पूनम पांडेने मृत्यूच्या वृत्ताबद्दल समोर येऊन स्पष्टीकरण दिलं होतं. तिने सर्व्हिकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी तिच्या पीआर टीमने पोस्ट केल्याचे सांगितले होतं. त्यानंतर आता पूनम पांडेची पुन्हा नवी पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून पोस्टचं बाजारीकरण करणाऱ्यांचा शोध घेणार असल्याचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
पूनम पांडेने पोस्ट करत म्हटलं की, 'मी काय केलं, ते माहीत आहे. मला माझा हेतू ठाऊक आहे. माझ्या पोस्टचे कुणी बाजारीकरण केलं, त्यांच्याविषयी प्रचंड राग आहे. माझी सर्व्हिकल कॅन्सरच्या जनजागृतीविषयी भूमिका स्पष्ट होती. त्यातून मला अनेकांकडून आधार मिळाला होता'.
'मी त्या आजारासाठी काम केलं, त्या माझ्या पोस्टचा फायदा दुसऱ्यांनाच झाला आहे. त्यामुळे माझ्या पोस्टचे कुणी बाजारीकरण केले, त्यांचा शोध घ्यायचा आहे', असंही पांडे म्हणाली.
तत्पूर्वी, पूनम पांडेच्या मृत्यूबाबतची पोस्ट तिच्या पीआर टीमने शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या वृत्तानंतर काही तासांत मी जिवंत असल्याचे स्पष्ट केले होते. तिने सर्व्हिकल कॅन्सर या आजाराबाबत जनजागृती करत असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, पुनमच्या मृत्यूच्या पोस्टबाबतचा खुलासा केल्यानंतर तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती तिने पोस्ट करत दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.