Dhadak 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhadak 2 : 'धडक २'ची रिलीज डेट जाहीर, सिद्धांत चतुर्वेदी-तृप्ती डिमरी करणार रोमान्स

Dhadak 2 Release Date : बहुप्रतीक्षित चित्रपट 'धडक 2' ची रिलीज डेट समोर आली आहे. या चित्रपटातून सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shreya Maskar

बहुप्रतीक्षित चित्रपट 'धडक 2' (Dhadak 2) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे 'धडक 2' च्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) पाहायला मिळणार आहेत.

'धडक 2' मध्ये सिद्धांत आणि तृप्ती रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे.'धडक 2' चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इकबाल हिने केले आहे. तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या अंतर्गत चित्रपटाची निर्मिती होणार आहे. 'धडक 2' हा रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटाच्या रिलीज डेट पोस्टमध्ये सिद्धांत आणि तृप्ती एकमेकांच्या मिठीमध्ये पाहायला मिळत आहेत. या पोस्टला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "मरने और लड़ने में से एक को चुनना हो...तो लड़ना।" या कॅप्शनं सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.

'धडक 2' रिलीज डेट

'धडक 2' मध्ये आपल्याला प्रेमासाठीची लढाई पाहायला मिळणार आहे. यात कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या चित्रपटात जात, प्रेम , वर्गभेद आणि बंडखोरी पाहायला मिळणार आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. हा धमाकेदार चित्रपट 1 ऑगस्ट 2025 ला पाहता येणार आहे. 'धडक 2'च्या माध्यमातून सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धडक

'धडक 2' हा चित्रपट 'धडक'चा सीक्वल आहे. 'धडक' चित्रपट 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर ही जोडी पाहायला मिळाली. चाहते 'धडक 2' साठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT