Shriya Pilgaonkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shriya Pilgaonkar : बोल्ड सीन करण्याबद्दल श्रिया पिळगांवकर स्पष्टच म्हणाली, "संस्कार हे..."

Shriya Pilgaonkar Reaction On Bold Scenes : अभिनेत्री श्रिया पिळगांवकर लवकरच नवीन वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात आता तिने सीरिजमधील बोल्ड सीनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिट शोमध्ये, सीरिजमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनय आणि लूकचे चाहते दिवाने आहेत. श्रियाने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी देखील गाजवली आहे.

श्रिया पिळगांवकरने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. तिच्या वेब सीरिज खूपच भन्नाट असतात. अशात आता श्रिया पिळगांवकर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत वेब सीरिजमधील बोल्ड सीनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका मिडिया मुलाखतीत श्रियाला विचारण्यात आले की, "सीरिजमध्ये बोल्ड सीन करताना तुझ्या डोक्यात कोणते विचार असतात?" यावर उत्तर देत श्रिया म्हणाली, ऑफस्क्रीन संस्कार हे ऑनस्क्रीन संस्कारांपेक्षा जास्त महत्त्वाचे आणि गरजेचे आहेत. त्यामुळे मला माझ्या ऑफस्क्रीन संस्कारांवर खूप विश्वास आहे. कलाकार म्हणून मी स्वत:वर मर्यादा घालत नाही. बदलत्या काळानुसार एखादी गोष्ट सांगण्याची पद्धत देखील बदलली आहे. आता कामातली मर्यादा बदल्या आहेत. आता एखाद्या लव्हस्टोरीमध्ये मुलगा-मुलगी एकमेकांना किस करत आहेत. या सीनला मी नाही म्हणणार नाही. कारण त्या सीन मागील भावना काय आहेत? पडद्यावर कसं दाखवलं जाणार आहे? हे मला कळतं "

शेवटी श्रिया म्हणाली की, "एखाद्या सीरिजमधील बोल्ड सीनमुळे कोणाला जज करू नये. कारण तो सीन त्या कथेची गरज असते. माझ्या कामात माझे आई-वडील कायम मला साथ देतात. "

श्रिया पिळगांवकर लवकरच 'छलकपट' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या सीरिजसाठी खूप उत्सुक आहेत. आजवर श्रियाने अनेक गाजलेल्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. 'छलकपट' सीरिजमध्ये श्रिया पिळगांवकर पोलिसांच्या भूमिकेत आहे. ही वेब सीरिज 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT