Shreyas Talpade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade : 'मी जिवंत आहे....' मृत्यूच्या अफवांवर श्रेयस तळपदेने पहिल्यांदा सौडले मौन;म्हणाला...

Shreyas Talpade News : मराठी आणि बॉलिवून अभिनेता श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट केली आहे. ज्यात त्याने मृत्यूच्या अफवा पसरवणाऱ्यांसाठी लिहिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपट सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेसंबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांमध्ये त्याचा मृत्यू झाल्याता दावा करण्यात आला आहे.या सर्व खोट्या अफवांवर अभिनेता श्रेयसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयसने इन्स्टाग्रावर एक भलीमोठी पोस्ट शेअर करुन तो जिवंत असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याच्या या मृत्यूच्या सर्व बातम्या अफवा असल्याचे समोर येत आहे.

श्रेयसने त्याच्या पोस्टमध्ये काय लिहिले?

मी सर्वांना खात्री देऊ इच्छिता की मी अजून जिंवत आहे शिवाय आनंदी आणि निरोगी आहे. माझा मृत्यू झाल्याची पोस्ट माझ्या डोळ्यासमोर आली.मला माहिती आहे की सर्व चुकीच्या माध्यमातून अशा अफवा पसरत आहे,ही अत्यंत गंमतशीर ठरत असेल,मात्र याचा जेव्हा गैरवापर होतो,ते अत्यंत हानिकारक (Harmful)ठरु शकते.सुरुवातीस कोणीतरी या गोष्टी सुरुवात करतात मात्र या सर्वांमुळे विनाकारण माझ्या कुंटुबाला त्रास होतो.

माझी मुलगी जी दैनंदिन शाळेत जाते,तिला माझ्या आरोग्याची काळजी असते,ती मला दररोज प्रश्न विचारत असते. अशा चुकीच्या बातमीने माझ्या घरातील माणसांची भीती आणखी वाढलेली आहे. माझ्या मृत्यूच्या या बाताम्या पसरवणाऱ्याना मी थांबायला सांगले. माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या होत्या.जेव्हा अनेकजण अशा खोट्या बातम्या पसरवता तेव्हा मलाचा त्रास होत नाही तर माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तील हा त्रास होतो शिवाय घरातील लहान मुलांवर यांचा विशेष परिणाम होतो. लहान मुले ही परिस्थिती समजून घेऊ शकत नाहीत त्यामुळे ते प्रत्येक वेळी जास्त भावनिक(emotional) होतात.

ट्रोल्सना विनंती

माझ्या आजारपणात ज्यांनी माझ्या आरोग्याची काळजी घेतली शिवाय माझी विचारपूस केली त्यांचा मी मनापासून आभारी आहे. तुमचे प्रेम माझ्यासाठी कायम महत्त्वाचे आहे. फक्त माझी ट्रोल्सना एक विनंती आहे की, या गोष्टी(things) कृपया थांबवा. कोणाशीही अशी मस्करी करु नका. कोणाच्याही बाबतीत असे काही घडू नये अशी माझी इच्छा आहे,त्यामुळे मनापासून विचार करा. कोणाच्याही भावना दुखावून लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण योग्य नाही.

अभिनेता श्रेयसला गेल्या वेळी हृदयविकाराचा झटका आला होता.दरम्याने श्रेयस 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग(shooting) करत होता. अचानाक त्याला थकवा आणि अस्वस्थ वाटू लागले.रुग्णालयात पोहचल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यानंतर डॉक्टरांनी श्रेयस याची अँजिओप्लास्टी केली होती. इतकेच नाही तर त्यानंतर पुन्हा जन्म घेतल्याचे अभिनेता श्रेयसने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लज्जास्पद! बॉयफ्रेंडसोबत डिनर, निर्जनस्थळी शरीरसंबंध ठेवले, मित्रही पोहचले; पोलीस कॉन्स्टेबल महिलेवर तिघांचा बलात्कार

Alu Vadi Recipe: आज दुपारच्या जेवणासाठी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट खमंग अळू वडी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

शेतीपुरक व्यावसायिक महिलांना 'शेतकरी दर्जा' ? पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयक?

एलॉन मस्क यांनी रचला इतिहास, मस्क बनले जगातील पहिले ट्रिलिनियर

SCROLL FOR NEXT