Urvashi Rautela : एनबीके 109' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान उर्वशीला दुखापत; ॲक्शन सीनदरम्यान झालं फ्रॅक्चर

Urvashi Rautela Hospitalized : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला 'एनबीके 109' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झाली आहे.ॲक्शन सीनदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
Urvashi Rautela Hospitalized
Urvashi Rautela SAAM TV

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला 'एनबीके 109' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झाली आहे.ॲक्शन सीनदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी एक दु:खाची बातमी आहे. नंदामुरी बालकृष्णाच्या तेलुगू चित्रपट 'एनबीके 109'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या उर्वशीला शूटिंगदरम्यान दुखापत झालीय. उर्वशीला गंभीर फ्रॅक्चर झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार उर्वशीला चित्रपटाच्या ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. उर्वशीला इंटरट्रोकॅन्टेरिक हिप फ्रॅक्चर झाल असून तिला असहाय्य वेदना होत आहेत. तिला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून ती यातून लवकर रिकव्हर होईल, असं सांगण्यात येत आहे.

एनबीके 109 चित्रपट

उर्वशी रौतेला दक्षिणात्य अभिनेते बालकृष्ण यांच्या 'एनबीके 109' या तेलुगु चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉबी कोळी दिग्दर्शित 'NBK 109' चित्रपटात दुल्कर सलमान आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षक या तेलुगू चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.या चित्रपटाला थमन एस यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात नाही आली आहे. या चित्रपटाची शुटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे, याच शूटिंगदरम्यान उर्वशीला दुखापत झाली आहे.

Urvashi Rautela Hospitalized
Tauba Tauba Song : कतरिना कैफला विकीचा 'तौबा तौबा' कसा वाटला? म्हणाला, "ती मला बाराती डान्सर समजायची..."

अभिनेत्री उर्वशी रौतेला

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.तिचा सोशल मीडियावर चांगला चाहता वर्ग आहे. आपले विविध स्टायलिश फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर टाकत असते. तसेच आपल्या प्रोजेक्टविषयी चाहत्यांना अपडेट देत असते. उर्वशी रौतेला ही एक फॅशन आयकॉन आहे.

Urvashi Rautela Hospitalized
Mahadev Betting App Case : अभिनेता साहिल खानला न्यायालयाकडून जामीन मंजूर, कोणत्या कारणामुळे मिळाली सुटका ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com