Shreya Ghoshal Concert Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreya Ghoshal Concert: श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरी; स्टेजजवळ हाणामारी, दोघे बेशुद्ध; पाहा VIDEO

Shreya Ghoshal Concert Stampede: काल ओडिशा येथे श्रेया घोषालचा कॉन्सर्ट होता. याच कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगीची परिस्थिती निर्माण झाली.

Siddhi Hande

श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी प्रचंड गर्दी

गर्दीमुळे स्टेजजवळ हजारो लोकांची गर्दी

गर्दीत हाणामारी, दोन लोक बेशुद्ध पडले

श्रेया घोषाल ही लोकप्रिय गायिका आहे. श्रेया आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध करत असते. दरम्यान, श्रेयाचे अनेक ठिकाणी कॉन्सर्ट होतात. श्रेयाचा काल म्हणजेच गुरुवारी ओडिशा येथे कॉन्सर्ट होता. ओडिशामधील बाली यात्रेच्या शेवटच्या दिवशी श्रेयाचा कॉन्सर्ट होता. याच कॉन्सर्टदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली.

बाली यात्रेनिमित्त श्रेया घोषालचा कॉन्सर्टचा कार्यक्रम होता. यावेळी खूप गर्दी जमा झाली होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर हजारो लोकांची गर्दी स्टेजजवळ झाली. खूप जास्त गर्दी झाल्याने तिथे लोकांना काय करावे हे समजले नाही. गर्दी इतकी वाढली की स्टेजसमोर बॅरिकेट्सवर लोक पडू लागले. प्रत्येकाला स्टेजच्या जवळ जाऊन उभे राहायचे होते. त्यामुळे गर्दी वाढत गेली. परिणामी संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेली आणि तिथे हाणामारी झाली.

गर्दीत अनेक लोक बेशुद्ध

श्रेया घोषालच्या कॉन्सर्टसाठी स्टेजजवळ गर्दी वाढत होती. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. लोक इथून तिथे पळू लागले. याच गोंधळात दोन लोक बेशुद्ध झाले. कॉन्सर्टला खूप गर्दी झाल्याने लोकांना गुदमरल्यासारखे झाले.उष्णता आणि धक्काबुक्कीमुळेदेखील अनेक लोक पडले. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली.

गर्दीचे प्रमाण वाढतच होते. त्यामुळे घटनास्थळी असलेले सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस तातडीने मदतीला धावले. त्यांनी गर्दी हाताळण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध झालेल्या दोघांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

परिस्थिती हाताबाहेर गेली

कॉन्सर्टला हजारो लोकांची गर्दी जमली होती. ही गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांसह पोलिस आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम सुरक्षितपणे पार पडण्याची जबाबदारी गेली. त्यानंतर नागरिकांना शांत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT