Amruta Khanvilkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: अमृता खानविलवकरच्या मोबाईल वॉलपेपरवर आहे खास फोटो, तुम्ही पाहिलात का?

Amruta Khanvilkar: धर्मवीर 2 या चित्रपटाच्या प्रिमीयरला उपस्थिती लावली.यादरम्यानचा अमृताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

मनोरंजनविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या कायमच चर्चेत असते. अमृता चित्रपट आणि तिच्या नृत्य अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. लवकरच अभिनेत्री अमृता खानविलकर लाइकआणि सबस्क्राइब या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अलिकडे अमृताने धर्मवीर 2 या चित्रपटाच्या प्रिमीयरला उपस्थिती लावली.यादरम्यानचा अमृताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धर्मवीर 2 हा चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अमृता खानविलकर देखील या सोहळ्याला आली होती. यावेळी अभिनेत्रीच्या मराठमोळ्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले. लाल रंगाची साडी अन् केसात फूल असा पारंपारिक लूक अमृताने केला आहे. यावेळी अमृताच्या हातातील मोबाईल फोनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अमृताच्या मोबाईल फोनवर असलेल्या वॉलपेपरवर सर्वांच्या नजरा खिळल्या

सोशल मीडियावर अमृताचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल ोत आहे. यावेळी धर्मवीर 2 चित्रपटाच्या प्रिमीयरला अमृता अभिनेत्री मंजिरी ओकसोबत दिसतेय. दोघींही मराठमोळ्या अंदाजात फॅन्सची मने जिंकत आहेत. अशातच व्हायरल व्हिडीओवरील अमृताचा फोनचा वॉलपेपर नेटकऱ्यांचे लक्ष वेधतोय. अमृताच्या वॉलपेपरवर नेमका कोणाचा फोटो आहे अश्या प्रतिक्रिया येत आहे. यावरून अमृताने तिच्या मोबाईल फोनवर कोणत्या व्यक्तीचा नाहीतर श्री स्वामी समर्थ यांचा फोटो ठेवला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर स्वामींची मोठी भक्त आहे. यामुळेच अमृताने मोबाईल फोनच्या वॉलपेपरवर स्वामींचा फोटो ठेवला आहे. अमृताने तिच्या एका मुलाखतीत देखील सांगितले होते.

अमृता ही श्री स्वामी समर्थांची मोठी भक्त आहे. तिने अनेक मुलाखतींमध्ये स्वामींबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे. स्वामी नेहमीच आपल्यासोबत आहे. स्वामींचे काही जास्त सोपस्कार वैगेरे करायचे नसतात. नियमितपणे त्यांच्या मंदिरात जायला हवे असाही काही अट्टाहास नसतो. तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी नेहमी तुमच्यासोबत असतील.

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

SCROLL FOR NEXT