Shivali Parab SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shivali Parab : "वेड तुझे..."; शिवाली परबचा 'तो' VIDEO पाहून बॉलिवूड अभिनेत्यानं केलं कौतुक

Shivali Parab Dance Video : शिवाली परबने एक डान्स रील शेअर केली आहे. जे पाहून बॉलिवूड अभिनेत्याने कौतुक केले आहे. शिवालीची डान्स रील तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

शिवाली परबने "वेड तुझे" या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने शिवाली परबचे कौतुक केले आहे.

शिवाली परब आणि कॉरिओग्राफर रुपेश बने यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती कायम इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि डान्स रील शेअर करत असते. कॉरिओग्राफर रुपेश बनेसोबतचे तिचे डान्स रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ शिवाली परबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चक्क या व्हिडीओचे कौतुक बॉलिवूडचा सुपरस्टार रितेश देशमुखने ( Riteish Deshmukh ) केले आहे.

शिवाली परब रील

कल्याणची चुलबुलीने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. त्यात शिवाली परब आणि रुपेश बने रोमँटिक अंदाजात डान्स करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातील वेड तुझे या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 'वेड' हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने अवघ्या जगावर जादू केली. या चित्रपटात महाराष्ट्राचे लाकडे दादा-वहिनी रितेश देशमुख आणि जिनिलीया मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.

रितेश देशमुख काय म्हणाला?

रितेश देशमुखने शिवाली परबचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे. तसेच त्याने "तुम्ही दोघं खूप जबरदस्त आहात" असे लिहून त्यांचे कौतुक केले आहे. कौतुक केल्याबद्दल शिवाली परबने रितेश देशमुखचे आभार मानले आहे. तिने स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर करून लिहिलं की, "थँक्यू सर!दिवसाची कमाल सुरुवात..."

riteish deshmukh

चाहता वर्ग

शिवाली परब आणि रुपेश बनेच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून भरपूर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. "कमाल", "एकदम सुंदर", "खूपच छान", "सर्वोत्तम", "अप्रतिम", "केमिस्ट्री खूपच चांगली" अशा कमेंट्स येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT