Masti 4: पार्ट १,२ और ३ को याद करो...; रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानीची पुन्हा 'मस्ती'

Masti 4 Teaser: रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करण्यासाठी परतले आहेत. 'मस्ती ४'चा टीझर रिलीज झाला आहे.
Masti 4 Teaser
Masti 4 TeaserSaam Tv
Published On

Masti 4 Teaser: रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करण्यासाठी परतले आहेत. निर्मात्यांनी 'मस्ती ४'चा टीझर रिलीज केला आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. प्रेक्षकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, कारण हा चित्रपट यावर्षीच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चौथ्या भागाची कथा कशी असेल?

टीझरवरून असे दिसते की यावेळी कथा केवळ पुरुषचं नाहीत तर, महिला देखील विवाहबाह्य संबंधांमध्ये सहभागी होताना दिसणार आहेत. याचा अर्थ या चित्रपटात विनोद आणि ट्विस्टचा डबल डोस असेल. असे म्हटले जात आहे की "मस्ती ४" ची कथा पहिल्या भागाप्रमाणेच थ्रिलर कॉमेडीवर आधारित असेल.

Masti 4 Teaser
71st National Film Awards: राष्ट्रपतींच्या हस्ते आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; 'या' कलाकारांचा होणार सन्मान

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात एलनाज नोरोझी, रुही सिंग, नतालिया जानौसेक आणि श्रेया शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अर्शद वारसी, जेनेलिया डिसूझा, नर्गिस फाखरी, तुषार कपूर आणि शाद रंधावा हे लोकप्रिय चेहरे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

Masti 4 Teaser
Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकीच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

'मस्ती ४' चे चित्रीकरण फक्त ४० दिवसांत यूकेमध्ये झाले आणि सध्या त्याचे पोस्ट-प्रॉडक्शन सुरू आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मागील ३ भाग थिएटरमध्ये चांगलेचं गाजल्यानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का नाही हे पाहणं उत्सुकाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com