Manasvi Choudhary
अभिनेत्री मानसी नाईक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.
मानसी नाईक वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. ती मनमोकळेपणाने कायमच व्यक्त होते.
सोशल मीडियावर मानसीचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी मानसी सोडत नाही.
नुकतेच मानसीने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटसाठी मानसी नाईकने सिंपल असा ड्रेस परिधान केला आहे . लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.
साधा मेकअप, मोकळे केस असा मानसीचा लूक आहे. मानसीने निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट क्लिक केलं आहे.
मानसीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.