Mrs Universe 2025 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mrs Universe 2025 : भारताने रचला इतिहास; जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, कोण आहे शेरी सिंग?

Who Is Sherry Singh : 'मिसेस युनिव्हर्स 2025' चा किताब शेरी सिंग हिने जिंकला आहे. शेरी सिंग विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'मिसेस युनिव्हर्स 2025' स्पर्धेत भारताने विजय मिळवला आहे.

'मिसेस युनिव्हर्स 2025' चा किताब शेरी सिंगने जिंकला आहे.

'मिसेस युनिव्हर्स 2025' साठी जगभरातून 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'मिसेस युनिव्हर्स 2025' (Mrs Universe 2025) स्पर्धेत भारताने विजय मिळवला आहे. शेरी सिकंदर सिंग (Sherriy Sikandar Singh) हिने 'मिसेस युनिव्हर्स 2025'चा किताब जिंकला आहे. सध्या सर्वत्र तिचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

शेरी सिंगच्या विजयाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'मिसेस युनिव्हर्स 2025' चा किताब जिंकून तिने भारताचा मान वाढवला आहे. शेरी सिंग ही मिसेस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय स्पर्धक ठरली आहे. 'मिसेस युनिव्हर्स 2025' साठी जगभरातून 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

'मिसेस युनिव्हर्स 2025' स्पर्धा 1 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान मनिला, फिलीपिन्स येथे आयोजित केली होती. शेरी सिंग यूएमबी पेजंट्सने 'मिसेस इंडिया 2025' हा किताब जिंकल्यानंतर 'मिसेस युनिव्हर्स 2025' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. प्रेक्षक तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा, स्वभाव याचे देखील दिवाने झाले आहेत. तिने स्पर्धेत महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य या विषयांवर लक्ष केंद्रित केले.

शेरी सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम 20.4K फॉलोअर्स आहेत. येथे ती जिम रूटीनपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत सर्व गोष्टींचे अपडेट शेअर करते. शेरी सिंगचे लग्न झाले असून ती एका मुलाची आई देखील आहे. शेरी सिंगचा विजय जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. शेरी सिंग 'मिसेस युनिव्हर्स 2025'चा किताब जिंकल्यावर आपला आनंद व्यक्त केला. तिने सर्वांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT