Sherlyn Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

'साजिद खानवर सलमानचा हात, कोणीही काही बिघडवू शकत नाही'; शर्लिन चोप्राकडून लैंगिक छळाची तक्रार, मीडियासमोर ढसाढसा रडली

शर्लिन चोप्राकडून साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे.

Shivani Tichkule

मुंबई - शर्लिन चोप्रा बिग बॉस 16 (Big Boss) मध्ये साजिद खानच्या प्रवेशाला कडाडून विरोध करत आहे. शर्लिनने सर्वप्रथम सलमान खान (Salman Khan) आणि निर्मात्यांना साजिदला शोमधून बाहेर काढण्याची विनंती केली, परंतु जेव्हा असे काही घडले नाही तेव्हा शर्लिनने साजिद खानला (Sajid Khan) बिग बॉसमधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अभिनेत्रीने शनिवारी पुन्हा मुंबईतील जुहू पोलीस ठाणे गाठले. (Sherlyn Chopra Allegations on Sajid Khan)

मीडियाशी बोलताना शर्लिन चोप्रा म्हणाली, साजिद खानच्या डोक्यावर दुसरा कोणी नसून सलमान खानचा हात आहे. त्याच्यासोबत साजिद खानचे कोणीही काही बिघडवू शकत नाही. शर्लिन चोप्रानेही दावा केला आहे की, तिने महिला पोलीस अधिकाऱ्याला तिची तक्रार नोंदवण्याची विनंती केली, पण तेही झाले नाही.

शर्लिन पुढे म्हणाली, मी सहाय्यक पोलीस आयुक्तांना फोन केला आणि म्हणाले 'जुहू पोलीस मला मदत करत नाहीत. माझे म्हणणे ऐकून घेत नाही यासाठी वरून काही तरी दबाव आला असावा. मी विचार करत आहे की जर एखाद्या सेलिब्रिटीच्या बाबतीत असे घडू शकते तर सामान्य महिलेचे काय होणार नाही. असे बोलतात शर्लिनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

जुहू पोलिसांनी माझी तक्रार नोंदवली आहे. साजिद खानची चौकशी केली जाईल आणि या संदर्भात बिग बॉसशी संपर्क साधला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. तसेच एक आरोपी बिग बॉसच्या घरात असणे दुर्दैवी असल्याचे सांगितले. न्याय हवा असेल तर कारवाई झालीच पाहिजे असे देखील ती यावेळी म्हणाली.

शर्लिननं बोलताना बॉलिवूडचा दबंग अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खानला (Salman Khan) आवाहन देखील केलं आहे. शर्लिन म्हणाली की, सलमान खान यांना मी भाईजान बोलते, म्हणजे मी त्यांच्या बहिणी सारखीच आहे. त्यांनी माझी मदत करावी. मी सलमान खान यांच्या घराबाहेर शंतीपूर्वक आंदोलन करणार असल्याचंही शर्लिननं यावेळी सांगितलं. 

MeToo चळवळीदरम्यान साजिद खानवर अनेक मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. यामुळे साजिदला वर्षभर इंडस्ट्रीत काम न करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा परिस्थितीत साजिद खानला बिग बॉसमध्ये पाहून अनेक अभिनेत्रींनी त्याला विरोध केला. शर्लिन चोप्राही साजिद खानला शोमधून काढून टाकण्याची मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT